Vijay Wadettiwar on Sharad Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सहकुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची दिल्लीतील निवासस्थानी गुरुवारी भेट घेतली. या पाठोपाठ उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे. या भेटीमुळे शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार का? अशी चर्चा रंगली आहे. आता यावर बोलताना काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार यांनी पहिली प्रतिक्रिया देत सूचक वक्तव्य केले आहे. 


त्यातून कुछ तो गडबड है, असं म्हणायला स्कोप आहे


जय पराजय होतंच असतो, त्यातून येवढं खचून जाण्याची गरज नाही. मला संजय राऊत यांच्या देहबोलीतून, वागण्यातून थोडंसं फ्रस्टेशन आल्यासारखं दिसते आणि कदाचित या निराशेपोटी त्यांनी 'एकला चलो रे'चा नारा दिला असेल. त्यांचा पक्ष आहे, त्यांची विचारधारा आहे. त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, आघाडीम्हणून आम्ही एकत्र लढण्यास तयार आहोत. परंतु संजय राऊत यांच्या भुमिकेसंतर्भात एकदा स्पष्टता आली तर आम्ही आमचा निर्णय घेऊ. 


मला माहित नाही. संजय राऊत दिल्लीत आहे. दिल्लीतील सगळी माहिती त्यांच्याकडे अपडेट असते. कदाचित त्या आधारावर ते बोलत असतील. मात्र दिल्लीत सध्या ज्या बैठकांचा जौर वाढला. त्यातून कुछ तो गडबड है, असं म्हणायला स्कोप आहे. असे सूचक वक्तव्य काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.


अजित पवारांसोबत जाणे आणि भाजपासोबत जाणे हे एकच आहे. मी शरद पवार साहेबांना ओळखतो. त्यांच्याबरोबर जवळपास मी रोजच असतो. राज्यसभेत त्यांची आणि माझी बसण्याची जागा आजूबाजूलाच आहे. पुरोगामी महाराष्ट्राचा विचार, धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आम्ही या महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयत्न केला, अशा विचारांपासून शरद पवार दूर जातील, असे मला वाटत नाही. भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नौशे गौशे घाबरून पळून गेलेले आहेत. त्यांच्या नादाला लागून ते काही वेगळा विचार करतील असे वाटत नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या विधानावर  विजय वडेट्टीवार बोलत होते. 


फोडाफोडी करण्यात भाजपला असूरी आनंद येतो- विजय वडेट्टीवार


राष्ट्रवादी खासदारांबबात मला माहित नाही. निवडणूक झाली की इकडे जाणार, तिकडे जाणार ही चर्चा होत असते. मला विश्वास आहे पावस साहेब पुरोगामी विचार धरून त्यांनी आयुष्य घालवलंय,  त्यामुळे ते जाण्यास विचार करणार नाही. भाजपला दुसऱ्याचे घर फोडणं, फोडाफोडी करणं याशिवाय चैन येत नाही. त्यांना यातून असूरी आनंद येतो. दरम्यान, अदानी बद्दलची भुमिका पवार साहेब यांनी वेळोवेळी स्पष्ट केलीय.  दरम्यान, अदानी बद्दलची भुमिका पवार साहेब यांनी वेळोवेळी स्पष्ट केलीय असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. 


औपचारिकता म्हणून नागपूरात अधिवेशन 


हिवाळी अधिवेशनातून काही निष्पन्न होणार नाही. फुकट कशाला नागपूरात अधिवेशन घेतलं. चार पाच दिवसांचं अधिवेशन आहे. प्रश्नोत्तर नाही. औपचारिकता म्हणून अधिवेशन आहे. हेच अधिवेशन मुंबईत घ्यायला हवं होतं. नागपूरात दोन आठवडे अधिवेशन हवं. विदर्भातील प्रश्नांवर चर्चा होईल, असेही  विजय वडेट्टीवार म्हणाले.