Vijay Wadettiwar on Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कोकाटेंना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल, असे निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. नाशिक न्यायालयाच्या निरीक्षणानंतर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. कोर्ट असं बोलायला लागला तर कसं होईल? उद्या एखाद्याने खून केलं तर त्याला शिक्षा देताना कोर्ट असेच तर्क मांडणार का? असा सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार  (Vijay Wadettiwar) यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. 


कुठलाही गुन्हेगार असेल आणि तो शिक्षेस पात्र असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. निवडणुकीचा खर्च वाढणार आहे, म्हणून आम्ही त्याला माफ करतो न्यायालयाची अशी भूमिका हास्यास्पद आहे. न्यायालय असं वागणार असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी. असा सवाल ही त्यांनी विचारला आहे. ते नागपूर येथे बोलत होते. 


राज्यात 2706 शेतकरी आत्महत्या, महाराष्ट्र क्रमांक एकवर- विजय वडेट्टीवार


शेतकरी आत्महत्यात महाराष्ट्र क्रमांक एक वर गेलाय. शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे. कर्जात शेतकरी बुडाला आहे.  शेतमालाला भाव मिळत नाही, त्यामुळे कर्जमाफी मिळाली पाहिजे. वाटल्यास त्यासाठी कर्ज काढा, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. अशी मागणी ही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर  यांनी केली आहे. बुलढाणा येथील युवा शेतकऱ्याला पुरस्काराने सन्मानित करता आणि तो पाण्यासाठी आत्महत्या करतो? सरकारी कार्यालयात चकरा मारूनही त्याच्या शेताला पाणी आणि वीज देत नाही. मग त्या पुरस्काराचा काय अर्थ आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात ही एक काळी नोंद आहे. अशी टीका ही विजय वडेट्टीवार 


नाना पटोले यांनी घाई केली, एवढेच माझं म्हणणंय- विजय वडेट्टीवार 


नाना पटोले यांनी काय ऑफर दिली हे मी माध्यमातून पाहिलं. राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो, शत्रूही नसतो. वेळेप्रमाणे राजकारण चालतं, त्यामुळे उद्या काय वाढून ठेवले आहे हे आता सांगता येत नाही. यांची आत्ताची ओढाताण पाहता पुढे काय होईल हे सांगणं कठीण आहे. मात्र नाना पटोले यांनी घाई केली, एवढेच माझं म्हणणं आहे. असे म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या ऑफरच्या चर्चेवर विजय वडेट्टीवार
 यांनी भाष्य केलंय.


नितेश राणे संधी साधू माणूस- विजय वडेट्टीवार


नितेश राणे संधी साधू माणूस आहे. त्याला योगी व्हायचं आहे की काय बनायचं आहे हे मला माहित नाही. मात्र भाजपच्या काही प्रस्थापित नेत्यांसाठी नितेश राणेंचे असं बोलणं धोक्याची घंटा आहे. यांचे जुने व्हिडिओ पहा हे आणि यांचे वडील स्वतः हलालचं मटन दाबून खाताना दिसतील. रमजानच्या कार्यक्रमांमध्ये मटन तोडताना दिसतील. अशी टीका ही विजय वडेट्टीवार यांनी केलीय. 


हे ही वाचा