Vijay Shivtare on Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत आले, तरी  विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्यातील संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाही. अशातच विजय शिवतारे यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politicle Updates) चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. विजय शिवतारे त्या पराभवाचा वाचपा काढणार का? अशा राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं आहे.             


रविवारी एका कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी बारामतीच्या पवारांवर तोफ डागली. सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान, केवळ विजय शिवतारेंचा नसून तो संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा असल्याचं शिवतारे यांनी जाहीरपणे म्हटलं. तसेच, अजित पवार त्या अपमानासाठी इथे येऊन माफी मागणार का? असा प्रश्नही शिवतारे यांनी उपस्थित केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसल्याचा म्हणत, पवार कुटुंबीयांवर शिवतारे यांनी यावेळी निशाणा साधला आहे.                   


बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात तब्बल 5 लाख 80 हजार मतदार असलयाचा दावा केला. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णयही शिवतारे यांनी घेतला आहे. तसेच, आता गुलामगिरी करणार नसल्याचा इशारा शिवतारे यांनी दिला आहे. अशातच येणाऱ्या लोकसभेत दोन पवार विरुद्ध विजय शिवतारे आशी लढाई होणार का? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. दरम्यान, विजय शिवतारे पुरंदर तालुक्यातील महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या खेळ खेळू पैठणीचा कार्यक्रमादरम्यान बोलत होते.                                            


पाहा व्हिडीओ : Vijay Shivtare vs Ajit Pawar : अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय, शिवतारेंनी दंड थोपटले                



महत्त्वाच्या इतर बातम्या :                   


Ahmednagar Lok Sabha: अहमदनगरमध्ये विखेंविरुद्ध लंके? धनश्री विखे, राणी लंकेंची राजकीय कार्यक्रमात वाढती हजेरी, अहमदनगरचा किल्लेदार कोण?