Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. प्रत्येक जण निवडणुकीच्या निकालानंतर आत्मविश्वासाने विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणनीती आखत आहे. मात्र रणनिती आखत असताना काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करताय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे
लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) निकाल 4 जून रोजी जाहीर झाला. महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना लोकसभा निवडणुकीत जनतेने कौल दिला. त्यानंतर तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. त्यामुळेच आता महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ कोण? यावर सुद्धा काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून निवडणुकीआधी दावे केले जात आहे.
288 जागांसाठी उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात
शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे. शिवाय पक्ष विधानसभेसाठी एकटा लढला तर त्याचा परिणाम काय होईल? याबाबत शिवसेना आणि काँग्रेस आपल्या पदाधिकाऱ्यांकडून आणि नेत्यांकडून आढावा घेत आहे. महाविकास आघाडीने एकत्रित मिळून लोकसभेच्या 48 पैकी 31 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर विधान परिषदेच्या चार जागांसाठी सुद्धा महाविकास आघाडीने एकी दाखवली. आता विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना हीच ताकद महाविकासाकडे दाखवणार की आपल्या स्वपक्षाच्या ताकदीवर विश्वास ठेवत स्वबळाचा नारा देणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
देशातील विविध राज्यातील संख्याबळ
उत्तर प्रदेश - 80
समाजवादी -37
भाजप - 33
काँग्रेस - 6
राष्ट्रीय लोक दल - 2
आझाद समाज पार्टी - 1
अपना दल - 1
महाराष्ट्र - 48
काँग्रेस - 13
भाजपा - 9
शिवसेना ठाकरे - 9
राष्ट्रवादी शरद पवार - 8
शिवसेना शिंदे - 7
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार - 1
अपक्ष - 1
पश्चिम बंगाल - 42
तृणमूल काँग्रेस - 29
भाजप - 12
काँग्रेस - 1
लोकसभा निवडणकीत यंदा भाजपची पिछेहाट झाली असून गत 2019 च्या निवडणुकांपैकी 63 जागा घटल्या आहेत. तर, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पक्षाने मोठी आघाडी घेत 16 जागांवर विजय मिळवला आहे. इंडिया आघाडीला बहुमत न मिळाल्याने मोदींच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने तिसऱ्यांदा सरकार स्थापनेचा दावा केला आहे. एनडीए आघाडीला 294 जागांवर विजय मिळाला असून इंडिया आघाडीला 232 जागांवर विजय मिळाला आहे. तर, अपक्षांसह इतर 17 उमेदवारांचा विजय झाला.
इतर महत्वाच्या बातम्या