Chhatrapati Sambhajinagar: लोकसभा निवडणूकीनंतर राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणूकीची सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असताना महायुतीतच आमदारांची पळवापळवी झाल्याचं दिसून येतंय. विधनसभेच्या पार्श्वभूमीवर कन्नडचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते  नितीन पाटील  यांनी आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केलाय. त्यामुळे कन्नडमध्ये  शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत पहायला मिळण्याचे संकेत आहेत.


 राज्यात कुठला आमदार कुठल्या पक्षात जाणार? कोणत्या पक्षाचं बलाबल कसे राहणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह सर्वांनाच असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीतच पळवापळवी झाल्याचं दिसलं.कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आज प्रवेश केला आहे. मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर पक्षप्रवेश केला आहे.


विधानसभेत कशी राहणार लढत?


कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार नितिन पाटील यांनी काँगेसमधून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता माजी आमदार नितिश पाटलांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यापूर्वीच त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभा लढण्याची ग्वाही दिली होती. मात्र, आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेशाने छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मतदारसंघात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिंदे गटाचे कन्नड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्चस्व असल्याचे सांगण्यात येत असताना नितिन पाटील यांच्या अजित पवार गटातील प्रवेशामुळे विधानसभेत शिवसेना विरुध्द शिवसेना नाही तर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात लढत दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


कन्नड मतदारसंघात तिहेरी लढत होण्याचे संकेत


कन्नड विधानसभा निवडणूकीत २०१९ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते हर्षवर्धन जाधव तर उद्धव ठाकरे गटाकडून उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी देण्यात आली होती. शिंदे गटाकडून नितिन पाटील हे संभावित उमेदवार समजले जात असताना त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने कन्नडची जागा आता महायुतीत शिंदे गटातून अजित पवार गटात जाईल चर्चा आहे. दरम्यान, विधानसभेत हर्षवर्धन जाधव विरुध्द उदयसिंह राजपूर विरुद्ध नितिश पाटील अशी तिहेरी लढत होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.


हेही वाचा:


मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकणार? राजकीय आखाड्यात उतरल्याने कुणाला फटका, कुणाचा फायदा?


अर्थमंत्र्यांना फुटलं हसू, मध्येच लावला डोक्याला हात, सगळं बघून राहुल गांधी भडकले, संसदेत काय घडलं?