Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष आपल्या आमदारांना जपताना दिसत आहेत. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत (Vidhan Parishad Election) 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकीत ठाकरे गटाकडून आमदारांची विशेष काळजी घेतली जात आहे. निवडणुकीसाठी ठाकरे गटाने खास प्लॅन आखलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 


कसं असणार ठाकरेचं नियोजन? 


आमदारांना खेळीमेळीच्या वातावरणात ठेवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असणार आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेही आमदारांसोबत आदित्य ठाकरेंसोबत राहणार आहेत. शिवाय सर्व 16 आमदारांच्या राहण्याची व्यवस्था एकाच मजल्यावर करण्यात येणार आहे. आयटीसी ग्रॅन्ड सेट्रलमध्ये आदित्य ठाकरे आमदारांसोबत राहण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर ठाकरेंकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. 


ठाकरे गटाचे आमदार ITC ग्रँड परळमध्ये पोहोचले, कोण कोण उपस्थित? 


1. अजय चौधरी 
2. वैभव नाईक 
3. उदयसिंग राजपूत
4. राजन साळवी 
5. प्रकाश फातर्फेकर 
6. राहुल पाटील 
7. सुनील प्रभू 
8. सुनील राऊत 
9. संजय पोतनीस 
10. आदित्य ठाकरे 
11. रमेश कोरगावकर 


अनुपस्थित असलेले आमदार कोणते? 


1. कैलास पाटील (उद्या सकाळी पोहचणार आहेत...)
2. नितीन देशमुख (उद्या सकाळी पोहचणार)
3. ऋतुजा लटके (घरी कार्यक्रम असल्याने अनुपस्थि)
4. शंकरराव गडाख (उद्या दुपारी पोहचतायत)
5. भास्कर जाधव (थोड्याच वेळात पोहचतील)


आमदार सुनील प्रभू आणि राजन साळवे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेही उपस्थित होते. 


विधानपरिषद निवडणुकीचं समीकरण काय? कोणाला किती मतांची गरज? 


सध्या महायुतीकडे एकूण 200 आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडे 65 आमदार आहेत. यामध्ये विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वबळावर आपले उमेदवार निवडूण आणायचे असतील तर अजून 4 मतांची गरज आहे तर ठाकरे गटाला आपला उमेदवार निवडून आणायचा असल्यास 8 मतांची गरज आहे. भाजपला आपले 4 उमेदवार स्वबळावर निवडून आणता येऊ शकतात. माञ पाचवा उमेदवार निवडून आणायचा असेल तर त्यांना देखील स्वतःची 8 मते असणं गरजेचं आहे. सूत्रांचा माहितीनुसार प्रत्येक पक्षाला आपली मतं स्वतः गोळा करावी लागणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


Manoj Jarange on Girish Mahajan : गिरीश महाजनांना वळवळ होती, जामनेरमध्ये 1 लाख 36 हजार कुणबी मराठे, नगराध्यक्ष म्हणाले, याचा टांगा पलटी करतो : मनोज जरांगे