Vidhan Parishad Election Result : मुंबईतील विधानपरिषद निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचाच डंका पाहायला मिळालाय. मुंबई पदवीधर मतदारसंघातून (Mumbai Graduate Constituency Election) अनिल परब यांचा 26 हजार 26 मतांनी विजय मिळवला. तर शिक्षक मतदारसंघातूनही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते जगन्नाथ अभ्यंकर यांनी बाजी मारली आहे. अभ्यंकर यांनी 4 हजार 83 मतांनी विजयश्री खेचून आणली आहे. 










नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवनात पार पडली मतमोजणी 


विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  11 हजार 598 मते वैध ठरली तर 402  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी   5 हजार 800 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. 






जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मतं 


बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)  पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मतं मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.


मुंबई पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर ॲड. अनिल परब ह्यांनी मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे ह्याची भेट घेतली. या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी त्यांचे अभिनंदन केले. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Arjun Khotkar on Raosaheb Danve : ज्या कपटी लोकांनी आम्हाला छळलं, त्यांचा सत्यानाश झाला; अर्जुन खोतकरांची नाव न घेता रावसाहेब दानवेंवर टीका