Arjun Khotkar on Raosaheb Danve, Jalna : "ज्या कपटी लोकांनी आम्हाला छळलं, तुम्हा-आम्हाला त्रास दिला. त्यांचा सत्यानाश झाला", असे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर म्हणाले आहेत. अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी नाव न घेता भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर टीका केली आहे. जालना विधानसभेच्या (Jalna Vidhansabha) तयारीसाठी पदाधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये ते  बोलत होते. 


आपल्याला सावध राहण्याची वेळ आलेली आहे


अर्जुन खोतकर म्हणाले, ज्यांनी संकटात टाकलं त्यांना कधी सोडायचं नसतं आणि त्यांच्यापासून सावध पण राहायचं असतं. आता आपल्याला सावध राहण्याची वेळ आलेली आहे. ज्या कपटी लोकांनी आम्हाला छळलं आम्हाला त्रास दिला त्याचा सत्यानाश झाला असं म्हणत अर्जुन खोतकर आणि अप्रत्यक्षरीत्या रावसाहेब दानवे यांच्यावरती टीका केलीय. दरम्यान विधानसभा आढावा बैठकीमध्ये आपल्याला आता सावध राहायची वेळ आली असल्याचा इशारा देखील त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. 


लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंचा पराभव 


जालना लोकसभा मतदारसंघात 5 वेळेस लोकसभेवर निवडून गेलेल्या रावसाहेब दानवेंना 2024 लोकसभा निवडणुकीत मात्र पराभव स्वीकारावा लागला. पाचवेळा खासदार असलेले आणि केंद्रात रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या रावसाहेब दानवेंना (Raosaheb Danve) सगळ्यात मोठा राजकीय पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी त्यांचा पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत  3 लाख 30 हजार मतांनी निवडून आलेले रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) 2024 च्या निवडणुकीत सुमारे 1 लाख मतांच्या फरकाने पराभूत झाले. रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्यानंतर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनीही आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर आता अर्जुन खोतकर यांनीही नाव न घेता टीका केली आहे. "आम्हाला शत्रू म्हणणाऱ्या लोकांनी पैठण मधून किती मतदान आहे हे पाहावे. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना कमी मतदान याचे वेगवेगळे कारणे आहेत. जरांगे यांनी दानवे (Raosaheb Danve) यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे त्यांचा पराभव झाला", असं मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं होतं. 


लोकसभा निवडणुकीत कोणाला किती मतं?


कल्याण काळे - 6 लाख 7 हजार 897 - काँग्रेस 


रावसाहेब दानवे - 4 लाख 97 हजार 939 - भाजप 


मंगेश साबळे - 1 लाख 55 हजार - अपक्ष उमेदवार 


इतर महत्वाच्या बातम्या 


Devendra Fadnavis on Pankaja Munde : केंद्रीय नेतृत्वाकडून पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...