Rahul Gandhi on Narendra Modi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (1 जुलै) राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर  केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्दे उपस्थित केले. यावेळी त्यांनी अयोध्येचाही उल्लेख केला. राहुल गांधी लोकसभेत भाषण करत असताना त्यांच्यासोबत फैजाबादचे सपा खासदार अवधेश प्रसादही लोकसभेत बसले होते.


यादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, "अयोध्या-फैजाबादमधील सपा खासदार अवधेश प्रसाद यांनी त्यांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून निवडणूक लढवण्यासाठी दोनदा सर्वेक्षण केले. अयोध्येतून निवडणूक लढवू नका, अयोध्येतील जनता तुम्हाला पराभूत करेल, असे सर्व्हेतील लोकांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळेच नरेंद्र मोदी वाराणसीला गेले आणि तिथून निसटले.


अयोध्येत भाजपचा पराभव का झाला?


 राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, अयोध्येतून समाजवादी पक्षाचे खासदार झालेले अवधेश प्रसाद यांनी त्यांना पहिल्या दिवसापासूनच निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास असल्याचे सांगितले. राहुल म्हणाले की, अयोध्या-फैजाबादच्या सपा खासदाराने मला सांगितले की तेथील लोकांची जमीन हिसकावून घेतली आहे. मात्र त्याला भरपाई देण्यात आली नाही. ज्यांची जमीन घेतली त्यांना मंदिराच्या उद्घाटनालाही बोलावण्यात आले नाही.


नरेंद्र मोदींनी अयोध्येतील जनतेच्या मनात भीती निर्माण केली


राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, खासदार अवधेश प्रसाद यांनी त्यांना सांगितले की, छोट्या दुकानदारांचे व्यवसाय उद्ध्वस्त करून त्यांना रस्त्यावर आणण्यात आले. उद्घाटनाला अदानी-अंबानी उपस्थित होते, पण अयोध्येतील कोणीही नव्हते. नरेंद्र मोदींनी अयोध्येतील जनतेच्या मनात भीती निर्माण केली. त्यांच्या जमिनी घेतल्या. त्यांचे घर पाडण्यात आले आणि उद्घाटन होईपर्यंत त्यांना मंदिरात प्रवेश दिला गेला नाही.








इतर महत्वाच्या बातम्या 


Arjun Khotkar on Raosaheb Danve : ज्या कपटी लोकांनी आम्हाला छळलं, त्यांचा सत्यानाश झाला; अर्जुन खोतकरांची नाव न घेता रावसाहेब दानवेंवर टीका