मुंबई : सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) चांगलेच वादळी ठरत आहे. त्याची प्रचिती आजदेखील (10 जुलै) आली. मराठा-ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीवरून आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सत्ताधारी-विरोधक थेट आमनेसामने आले. या मुद्द्याला घेऊन दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सभागृहाच्या मोगळ्या मैदानात येऊन दोन्ही गटाचे आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. हा गोंधळ थांबवण्यासाठी विधापरिषदेत थेट मार्शल यांना बोलवण्याची वेळ आली. पण हे मार्शलच न आल्यामुळे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) चांगल्याच संतापल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी सुरक्षा प्रमुखाची चांगलीच झाडाझडती घेतली आहे. 


नीलम गोऱ्हे संतापल्या, अधिकाऱ्यांची झाडाझडती


विधानपरिषदेत सत्ताधारी-विरोधक यांच्यात गोंधळ वाढलेला असताना नीलम गोऱ्हे दोन्ही बाजूच्या आमदारांना शांत राहण्याचे आवाहन करत होत्या. परंतु त्यांचा आदेश झुगारून दोन्ही बाजूचे आमदार चांगलेच आक्रमक झाले होते. आमदार सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत होते. शेवटी हा गोंधळ थांबावा यासाठी नीलम गोऱ्हे यांनी थेट मार्शलला पाचारण केले. पण मार्शलला बोलवण्याचा आदेश देऊनही ते सभागृहात आलेच नाहीत.


गोऱ्हे यांनी अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती


शेवटी गोऱ्हे यांना सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. त्यानंतर मात्र कोऱ्हे यांना विधानपरिषदेचे सुरक्षा प्रमुख तसेच विधीमंडळ सचिव यांना तातडीने बोलावले. तसेच या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत गोऱ्हे यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. तशी माहिती सूत्रांनी दिली. 


विधानपरिषदेत नेमकं काय घडलं? 


आज विधानपरिषदेचे कामकाज सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा होती. पण काल (9 जुलै) पर पडलेल्या मराठा-ओबीसी (Maratha-OBC Reservation) आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीवरून सत्ताधारी-विरोधक आक्रमक झाले. या बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाही, म्हणून सत्ताधारी संतापले. तर ही बैठख विधिमंडळात का घेतली नाही? असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. याच गोंधळात  पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. शेवटी गोंधळ चालूच राहिल्यामुळे नीलम रोऱ्हे यांना विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.


हेही वाचा :


संजय कुटेंना पाहून विजय वडेट्टीवार म्हणाले, तुम्ही खुर्च्या उबवा,आम्ही प्रश्न सोडवतो


मराठा आरक्षणावरुन सभागृहात गोंधळ, विरोधक बैठकीला गैरहजर राहिल्यानं सत्ताधाऱ्यांचा संताप, विधानसभेचं कामकाज तहकूब


Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांनी घेतली धनगर उपोषणकर्त्या तरुणांची भेट; पालकमंत्री गिरीश महाजनांना सुनावले खडे बोल!