मुंबई: राज्यात महाविकास आघाडी आणि वंचितची (Vanchit Bahujan Aaghadi) जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतरही वंचित बहुजन आघाडीने मविआच्या काही उमेदवारांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. वंचित आघाडीनं पुण्यातून वसंत मोरेंना (Vasant More) उमेदवारी जाहीर केली आहे तर बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पाठिंबा दिला आहे. बारामतीमध्ये आपण उमेदवार देत नसल्याचं स्पष्ट करत सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला आहे.  


वंचितकडून महाविकास आघाडीसोबत मैत्रिपूर्ण लढत होत असल्याचं चित्र सध्यातली दिसतंय. कारण या आधीही वंचितकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांना आणि गडकरींचे विरोधक उमेदवार काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 


वंचितने या आधी दोन याद्या जाहीर केल्या होत्या. आता तिसऱ्या यादीत नांदेडमधून अविनाश बोसिरकर, परभणीतून बाबासाहेब उगळे, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान, पुण्यातून वसंत मोरे आणि शिरूरमधून मंगलदास बांदल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


वसंत मोरे-प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर उमेदवारी


पुण्यातील धडाडीचे नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी या आधी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. त्याच दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांचीही भेट घेतली होती. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं दिसतंय. त्याचमुळे आता वंचितच्या वतीने वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्या माध्यमातून पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात मराठा मतं आकर्षित करण्याचा मानस असल्याचं दिसतंय. 


कोल्हापुरात शाहू महाराजांना वंचितचा पाठिंबा


वंचित बहुजन आघाडीने कोल्हापुरात उमेदवार न देता काँग्रेसचे शाहू महाराज यांना पाठिंंबा जाहीर केला आहे. त्याचवेळी नागपुरात भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढणारे काँग्रेसचे विकास ठाकरे यांनाही पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. 


वंचितचे आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार -



  • नांदेड - अविनाश बोसिरकर

  • परभणी-  बाबासाहेब उगळे

  • छत्रपती संभाजीनगर - अफसर खान

  • पुणे -  वसंत मोरे 

  • शिरूर - मंगलदास बांदल 

  • हिंगोली - डॉ. बी.डी. चव्हाण

  • लातूर - नरिसिंहराव उदगीरकर

  • सोलापूर - राहुल काशिनाथ गायकवाड

  • माढा - रमेश नागनाथ बारसकर

  • सातारा - मारुती धोंडीराम जानकरधुळे - अब्दुल रहमान

  • हातकणंगले - दादासाहेब उर्फ दादागौडा चवगोंडा पाटीलरावेर - संजय पंडीत ब्राम्हणे

  • जालना - प्रभाकर देवमन बकले

  • मुंबई उत्तर मध्य - अबुल हसन खान

  • रत्नागिरी सिंधुदुर्ग - काका जोशी


ही बातमी वाचा: