मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Elction) तोंडावर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. वंचितने राज्यातील 11 जागांवर उमेदवार दिले आहेत. यात प्रामुख्याने रावेर, नागपूर दक्षिण मध्य, वाशिम, शिंदखेड राजा, शेवगाव, नांदेड दक्षिण या जागांचा समावेश आहे. तर रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यास अद्याप कालावधी आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. त्याआधीच उमेदवार जाहीर करण्यात वंचित बहुजन आघाडीने 'आघाडी' घेतली आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विधानसभेच्या 11 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. सर्व उमेदवार विदर्भ-मराठवाड्यातील आहे. यामध्ये भाजपचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.
- रावेर - शमिभा पाटील
- सिंधखेड राजा - सविता मुंडे
- वाशीम - मेघा डोंगरे
- धामणगाव रेल्वे- निलेश विश्वकर्मा
- नागपूर साऊथ वेस्ट - विनय भांगे
- डॉ. आविनाश नन्हे - साकोली
- फारुख अहमद - दक्षिण नांदेड
- शिवा नरांगळे -लोहा
- विकास रावसाहेब दांडगे- औरंगाबाद पूर्व (छत्रपती संभाजीनगर)
- किसन चव्हाण - शेवगाव
- संग्राम माने - खानापूर
ऑक्टोबर 12 पर्यंत निवडणुकीचे नोटिफिकेशन निघेल असं गृहित धरुन चाललो आहे. 15 नोव्हेंबरला मतदान कुठल्याही परिस्थितीत मतदान घ्यावं लागेल आणि निकाल जाहीर करत शपथविधी कार्यक्रम घ्यावं लागेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून यादी जाहीर : प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर म्हणाले, वेगवेगळ्या ओबीसी संघटना आणि त्याचबरोबर आदिवासी समुहातील राजकीय पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन निवडणुकीत उतरवण्याचे ठरवले आहे. या आघाडीला अजून आम्ही नाव दिलेलं नाही, पुढे नाव देणार आहोत. काही जणांशी आम्ही बोलतोय, सोबतच काही संघटनांशी बोलतोय . लोकसभा निवडणुकीत आम्ही पाहिलं आहे, पैशाचा महापूर होता. आता महापुराचा महापूर येईल विधानसभेत असं आम्हाला वाटतं. त्यामुळे उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून यादी जाहीर करतोय . रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, साकोली, लोहा, औरंगाबाद, शेवगाव, अनापूर ही पहिली यादी जाहीर करतो, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हे ही वाचा :