Vaibhav Naik on Narayan Rane : महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन तिढा कायम आहे. भाजपकडून राज्यसभेचे खासदार नारायण ही जागा लढवण्यासाठी आग्रही आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून या जागेसाठी आग्रह केला जातोय. मंत्री उदय सामंत यांचे बंधू ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Loksabha) मतदारसंघाबाबत ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार वैभक नाईक (Vaibhav Naik) यांनी लोकसभा लढवण्यावरुन खोचक सल्ला दिलाय. शेवटच्या टप्प्यात उमेदवारी मिळत असेल तर घेऊ नका. स्वाभिमान जपा, असा खोचक सल्ला वैभक नाईक यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांना दिलाय. 


काय म्हणाले वैभव नाईक?


रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. केंद्रिय मंत्री नारायण राणे मेळावे घेऊन या मतदारसंघात उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचं सांगत आहेत.  भाजप दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी जाहीर करते. मात्र राणेंची उमेदवारी जाहीर होत नाही. त्यामुळे राणेंनी आपला स्वाभिमान या जागेसाठी विसर्जित केला आहे, अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे. तसेच वैभव नाईक यांनी राणेंना स्वाभिमान टिकविण्याचा सल्ला दिला आहे. आता शेवटच्या टप्प्यात जर राणेंना उमेदवारी मिळाली तर ती त्यांनी घेऊन नये. उमेदवारी नाकारली तर त्यांच्या शब्दाला किंमत राहिल, असंही वैभव नाईक यांनी म्हटलंय. 


खासदार कसा असतो? हे दाखवणार


भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली तर मी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढेन. शिवाय निवडून आल्यानंतर खासदार कसा असतो हे दाखवेन. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार निवडून येईल. मी गेल्या 34 वर्षापासून या भागाचे नेतृत्व करतोय. जर चार विधानसभा मतदारसंघांनी मला लीड दिला तर मी जिंकलोच म्हणून समजा, असंही नारायण राणे यांनी सांगितलं होतं. 


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एका तरी शिवसैनिकाच्या घरी गेले का? 


 उद्धव ठाकरे शिवसेना उभी करताना कुठेही नव्हता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एका तरी शिवसैनिकाच्या घरी गेले का? अशी विचारणा नारायण राणे यांनी केली. लोकांना सहाय्य करणे ही उद्धव ठाकरेंची प्रवृत्ती नाही. फक्त जमा करणे हा त्यांचा एक वनवे कार्यक्रम असल्याची टीका त्यांनी केली. मुलाला अटक होऊ नये म्हणून तुम्ही गुपचुप मोदींना जाऊन भेटला. चार जूननंतर तुम्ही जेलमध्ये जाता की तडीपार होता ते पाहू असेही ते म्हणाले. उद्धव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर काय केलं, तर शिवसेना संपवून दाखवली, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली होती.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Satara : साताऱ्याची लढत ठरली! भाजपच्या उदयनराजेंच्या विरोधात शशिकांत शिंदे फायनल, थोड्याच वेळात उमेदवारी जाहीर होणार