Lok Sabha Election 2024 : एकीकडे लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) धामधूम अन् दुसरीकडे राज्यभरात आज गुढीपाडवा (Gudi Padwa) मोठ्या उत्साहात सजत केला जात आहे. दरम्यान, अशात सोलापूर लोकसभेचे (Solapur Lok Sabha) महायुतीचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांनी आज आपल्या निवासस्थानी सप्तनिक गुडी उभारली आहे.  यावेळी सातपुते कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने पूजा करत समृद्धीचे प्रतीक असलेली गुडी उभारली आहे. विशेष म्हणजे यावेळी बोलतांना 'भगवा आंतकवाद म्हणणाऱ्या सुशीलकुमार शिंदेंना (Sushilkumar Shinde) हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा' असे म्हणत राम सातपुतेंनी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यासह सुशीलकुमार शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 


गुडी पाडव्याच्या निमित्ताने सोलापूरकरांना (Solapur) राम सातपुते यांनी शुभेच्छा दिल्या असून, याचवेळी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकाही केली आहे. "गुडीपाडवा हा आनंदाचा क्षण, संपूर्ण सोलापूरकराना गुडीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. येणारे वर्ष आपल्या सर्वासाठी आनंद घेऊन येवो याचं शुभेच्छा या निमित्ताने देतो. हा देश पुन्हा एकदा वैभवला जावे, सोलापूरचा विकास व्हावा, सोलापुरात विमानतळ, आयटी पार्क सुरु करण्याचा संकल्प करत आहेत. हे हिंदूचे सण आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या वडिलांनी भगवा आंतकवाद शब्द वापरला होता. पण हिंदू सहिष्णू आहेत, ही गुडी म्हणजे भगवा आहे, त्यांनी काही म्हटलं तरी या हिंदू नववर्षाच्या त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देतो, असे सातपुते म्हणाले. 


सोलापूरकरांचे आमच्यावर प्रेम आहे...


विधानसभेत मी सर्वांचेच प्रश्न मांडतो, रात्री 11 पर्यंत थांबून मराठा समाजाचे प्रश्न मांडलेत. मराठा, ओबीसी सर्वच समाज माझ्यासोबत आहेत. तर, सोलापूरकरांना हिंदू नव वर्ष शुभेच्छा, पाचशे वर्ष तंबूत असलेल्या श्रीरामाची मूर्तीची प्रतिष्ठापना या वर्षात झाली.  पंतप्राधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर, काशी विश्वनाथ कोरिडोर करत अभिमानाचे वर्ष केलं. सोलापूरकरांचे आमच्यावर प्रेम आहे, निवडणुकामध्ये देखील प्रेम आम्हाला मिळेल असे सातपुते म्हणाले आहेत. 


काँग्रेस भवन येथे गुडीपाडवा साजरा


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूरच्या काँग्रेस भवन येथे गुडीपाडवा साजरा करण्यात आला. यावेळी सुशीलकुमार शिंदेच्या हस्ते पूजा करून गुडी उभारण्यात आली. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर असल्याचे पाहायला मिळाले. 



इतर महत्वाच्या बातम्या : 


प्रणिती शिंदे-आडम मास्तरांच्या युतीवर राम सातपुतेंचा निशाणा, म्हणाले कुणी-कुठेही गेले तरी 30 हजार घरं दिलेला कामगार भाजपसोबत