मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं यानंतर त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांनी यावेळी महाराष्ट्र राज्याची प्रगती, नरेंद्र मोदी यांचं काम, नाशिक आणि ठाण्याच्या उमेदवार यावर भाष्य केलं.  


महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्रात मंगल कलश आला तो हा दिवस आहे.  हुतात्मा स्मारकाकडे आल्या नंतर ऊर्जा प्रेरणा मिळते. 106 हुतात्म्यांचे बलिदान अमही वाया जाऊ देणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 


राज्याने देशाला विचार दिले , संविधान दिलं,  फुले, शाहू आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा काम महाराष्ट्र करतो आहे. गेल्या 2 वर्षात सामान्य लोकांच्या सरकारने अनेक योजनांना चालना दिली आहे. हे काम आम्ही महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्याचा प्रयत्न करतो आहे. 


महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.  निवडणुका येतात जातात, आपली परंपरा , आरोप प्रत्यारोप याला खंडीत न करता मात्र ही पातळी खालावली आहे. विरोधकांकडून शिव्या शाप दिल्या जातात, त्यांच्याकडे या शिवाय काही राहील नाही. 


नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात देशाची प्रगती केली. आरोपांना उत्तर न देता कामाने उत्तर देत आहोत. घरी बसलेल्यांच्या मागे महाराष्ट्र उभा रहात नाही. काम करणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहतो, असा टोला उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनी लगावला.  



ठाणे आणि नाशिकचा उमेदवार लवकरच जाहीर करणार


ही मुंबई कामगारांच्या कष्टाने उभी राहिली आहे. आमच्या सरकारने पाच हजार गिरणी कामगार घर देण्याचं काम केलं. महायुती मुंबईच्या 6 जागा जिंकेल, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबई खड्डे मुक्त आम्ही करणार आहोत.  शिक्षण, आरोग्य, आणि  पायाभूत सोयी सुविधांकडे आम्ही लक्ष देत आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.


महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महायुतीत अद्याप नाशिक आणि ठाण्याचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. नाशिक आणि ठाण्याच्या उमेदवारांची घोषणा लवकरच होईल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेनं कालचं लोकसभा निवडणुकीसाठी दोन उमदेवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात आमदार रवींद्र वायकर आणि मुंबई दक्षिण मतदारसंघात आमदार यामिनी जाधव यांना उमेदवार जाहीर झाली आहे.


संबंधित बातम्या : 


भिवंडीतून जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांचा अर्ज, शक्तिप्रदर्शनासह जोरदार घोषणाबाजी

 Nashik Lok Sabha : महायुतीत नाशिकच्या जागेचा निर्णय नेमका कधी होणार? गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं!