मुंबई पोलिसांच्या परवानगीची पर्वा न करता महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi Protest)  जोडे मारो आंदोलन केले आहे.  गेट वे ऑफ इंडियावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  नाना पटोलेंची सरकारवर कडाडून टीका केली आहे. या मोर्चामध्ये खासदार शाहू महाराज, सुप्रिया सुळेंसह मविआचे अनेक नेते सहभागी झाले होते.. हुतात्मा चौकातून मविआनं रॅली काढली यानंतर गेट वे ऑफ इंडियाला मविआची सभा पार पडली. महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट करा,असे म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केली आहे.  तर पुतळा घाई घाईने उभारण्याची घाई का होती, असा सवाल देखील  उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला आहे. 


उद्धव ठाकरे म्हणाले,   ते करत आहेत ते राजकारण नाही तर गजकर्ण आहे. अशा महाराष्ट्र द्रोह्यांना आता महाराष्ट्र द्रोह्यांना आता गेट आऊट ऑफ इंडिया  करा. त्यांनी केलेल्या  चुकीला  आता माफी  नाही . देशाच्या प्रवेश द्वारावर आम्ही सांगतोय गेट आऊट ऑफ इंडिया... 


माफी नसती मागितली तर महाराष्ट्रने   शिल्लक ठेवलं नसतं :उद्धव ठकरे


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  महाराष्ट्र दौऱ्यावर होते. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी पहिल्या काही वाक्यांमध्येच महाराजांची आणि सर्व शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली. याआधी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजितदादांनी आणि नंतर शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराजांची आणि शिवप्रेमीची माफी मागितली होती. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,  माफी नसती मागितली तर महाराष्ट्रने   शिल्लक ठेवलं नसतं.   मगरूरीने माफी मागितली, त्यात हाफ आणि फुल हसत होते . माफी का मागितली सांगा?


माफी कशा कशाची मागणार? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल


उद्धव ठाकरे म्हणाले, महाराजांचा पुतळा  नौदल दिनाच्या दिवशी घाईने उभारण्याची  काही करायची गरज नाही . माफी कशा कशाची मागणार? राम मंदिर,  महाराज पुतळा अनेक घटना घडल्या त्यासाठी का? हा अपमान महाराष्ट्राचा आहे आणि याला कधीच माफी नाही .. यांना गेट आऊट करा... 




हे ही वाचा :


Sharad Pawar In Jode Maro Andolan : थांबतील, तक्रार करतील ते 84 वर्षीय शरद पवार कसले? पायाला दुखापत असतानाही अनवाणी पायाने जोडे मारो आंदोलनात सहभागी!