Uddhav Thackeray : चार जूननंतर तुम्ही केवळ मोदीच राहणार आहात, भाडोत्री फौज घेऊन उद्धव ठाकरेला संपवायला आलेत. संपवण्याचा प्रयत्न करा, हा महाराष्ट्र तुमचे राजकारण याच मातीत गडल्याशिवाय राहणार नाही, अशी सडकून टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या मुंबईमधील प्रचार सांगता सभेत उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदी, अमित शाह आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, तो शाह मोदी आणि अंबानीचा होऊ देणार नाही. ते म्हणाले की, दहा वर्ष ज्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला, त्यांना कायमचं तडीपार करण्याचा निर्णय मुंबईकरांनी केला पाहिजे. मुंबईमध्ये दोन सभा होत आहेत. एका बाजूला तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला गद्दार आणि भाडोत्री जनता असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट देणारे कोण आहात?
उद्धव ठाकरे यांनी यांनी नकली शिवसेना, नकली संतानवरूनही त्यांनी मोदींचा समाचार घेतला. ते म्हणाले की, तुम्ही तुमचं सांगा आम्ही आमचं सांगू, तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट देणारे कोण आहात? अशी विचारणा त्यांनी केला. जेव्हा इथं काही होत तेव्हा मदतीला सर्वात आधी शिवसैनिक धावून जातो, भाजप कार्यकर्ता जात नाही. बचाव कार्याला जाऊन हिंदू मुसलमान असं बघितलं नाही. तुमचा पक्ष स्वातंत्र्यलढ्यात नव्हता, संयुक्त महाराष्ट्रमध्ये देखील नव्हता.
लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे
ते म्हणाले की, देशाला तोडण्याचे काम भाजपने केले त्यांना जोडण्याचे काम राहुल गांधींनी केले. मणिपूरमध्ये महिलांना जिवंत जळण्याचे काम सुरु असताना त्यांचा आवाज पोहचू नये, यासाठी भाजपने प्रयत्न केले. तो सुद्धा आवाज घेऊन राहुल गांधींनी मणिपूर ते मुंबई पदयात्रा केली. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. त्यांनी सांगितले की, नंदुरबारमध्ये प्रियांका गांधींच्या सभेला तुफान गर्दी झाली. मोदींनी मागील निवडणुकीत केवळ चौदा सभा घेतल्या. आता मात्र सभांवर सभा घेत आहेत. रोड शो ला गर्दी नाही म्हणून गुजरातमधून लोकं आणली गेली. घाटकोपर घटनेची संवेदनशीलता पंतप्रधान मोदींनी दाखवली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या