Uddhav Thackeray on Ram Satpute :" मतदान अस्सल सोलापूरकराला निवडून द्या, बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा", असे आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोलापूरकरांना केले. उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदेही उपस्थित होत्या. 


नकली सेना बोलल्यानंतर मी त्यांना सोडतो असं वाटल का?


उद्धव ठाकरे म्हणाले, नकली सेना बोलल्यानंतर मी त्यांना सोडतो असं वाटल का? 48 पैकी 42 खासदार निवडून देण्याची गंमत आहे का ? आता शिवसेना तुमच्या सोबत नाही. त्या तक्तापर्यंत तुम्हाला पोहोचू देणार नाही. मोदीजी तुम्हाला देशाभिमानी हिंदुत्ववादी शिवसेना नकोय. रवीश कुमार यांचा एक व्हिडिओ पाहा, बाजूच्या राज्यात घडलेलं सेक्स स्कॅन्डल त्यांनी उघड केलं. त्याच्यासाठी आज मोदीजीची मतं मागत आहेत. प्रज्वलचे हात बळकट करा, हे असले हात बळकट करायचे? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 


महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला


पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, अटलजींचा आत्मा तिकडे रडत असेल. कोणाकडे आज भारतीय जनता पार्टी गेली, म्हणत असतील. मराठा आरक्षण बाबतीत तुम्ही निर्णय का घेतला नाही हे तुम्ही उद्याच्या सभेत सांगा. लोकांच्या मनात हीच भीती आहे की तुम्ही घटना बदलणार आहात. महाराष्ट्राच्या साध्या माणसाने लिहिलेली घटना मोदीजी तुम्ही बदलायला निघालेला आहात. भाजपात हिंमत असेल तर ज्या घटनेवर तुम्ही हा ठेवून शपथ घेतला. घटनेवरती हात ठेवून पाहा पूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही. यांना घटना का बदलायचे आहे ? कारण यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल आकास आहे. म्हणून महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. 


मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलेलं बाळासाहेबांना वचन दिलंय शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो. पण अमित शहा यांनी वचन मोडलं. मागील वेळी खासदार कोण होते? ते आता कुठं आहेत ? त्यांच्या भक्तांचा वापर केला आणि सोडून दिलं. प्रमाणपत्र प्रश्न असेल तर अमरावतीचा काय झालं?  यांचाही प्रश्न सोडवायचा होता.  स्वामीजी आता तुम्हीच यांना श्राप देऊन टाका, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Narendra Modi : महाराष्ट्रात मोदींच्या सभांचा धडाका, 16 सभांमुळे अडचणीच्या वाटणाऱ्या ठिकाणी वातावरण पलटणार का?