Uddhav Thackeray, Mumbai : "कल्याणला मी साधी माझी कार्यकर्ता उभी केली. तिच्या विरोधात होता गद्दार आणि त्या गद्दारचं कार्टे उभं होतं. त्याला जिंकवायला मोदीला आणला. ठाणे महापलिकेप्रमाणे मुंबई महापालिकाला सुद्धा भिकेला लावतील. जे फिक्स डिपॉझिट होतं ते किती राहील? एमएमआरडीए सुद्धा मी माझं सरकार आल्यावर रद्द करणार, बीएमसी समर्थ आहे बाकी सगळे काम करायला", असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. ते बुधवारी मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलत होते.
मुंबईला नखं लावायचं काम केलं तर आम्ही बोट छाटून टाकू
उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईला नखं लावायचं काम केलं तर आम्ही बोट छाटून टाकू. तुम्ही माझं सगळं घेऊन गेलात तरी नाकावर टिचून मी सरकार आणणार आहे. आताच्या घोषणा झाल्या त्यात शेवटची घोषणा महत्वाची होती. 'हर हर महादेव' त्यामुळे आता लढाई समोर आहे. 2 आमदार जिंकलो त्यात मिलिंद पण आहे. 4 खासदार निवडून आणले असा मी म्हणेल. आणखी काही जागा जिंकायची अपेक्षा होती. सगळे मोठे नेते आपल्याला भेटून गेले.
भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, राजकारणतली षंड माणसं आहेत
अनेक जण म्हणाले, उद्धवजी तुम्ही देशाला दिशा दाखवली. मी म्हणालो आपण जोपर्यंत सरळ होतो. तेव्हा सरळ एकदा वाकड्यात घुसलो तेव्हा आपण वाकड करतो. भाजप म्हणजे चोर कंपनी आहे. राजकारणतली षंड माणसं आहेत. आपण असा लढलो की मोदींना सुद्धा घाम फुटला. मोदीचं भाषण ऐकताना कीव येतीये. मी नगरसेवक कधी झालो नाही थेट मुख्यमंत्री झालो, जे शक्य होतं ते मी सगळं केलं. हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही. यांनी पक्ष कुटुंब सगळं फोडलं. आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे आहेत, असंही ठाकरे म्हणाले.
शिवसेना गंजलेली तलवार नाहीये, तळपती तलवार आहे
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना गंजलेली तलवार नाहीये, तळपती तलवार आहे. मुंबई टिकविण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता. आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्यला असा वागावलं जातय. ते दोन व्यापारी असं करत आहेत, त्यांची वृत्ती आपल्याला मुळासकट काढायची आहे. माझ्या आजोबाला शेलार मामा म्हणायचे हा शेलार नाही. आम्ही आमचं स्वतः चा लुटायला देणार नाही. लुटायला आला तर तोडून टाकू. मराठी माणसामध्ये सुद्धा फूट पाडण्याचा काम हे व्यापारी करत आहेत. ना खाऊ ना खाणे दूंगा अरे किती खाताय? खालेलं जाताय कुठाय? असा सवलाही उद्धव ठाकरेंनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या