रत्नागिरी : अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भारतीय जनता पक्ष होता, आता त्याचा भाडोत्री जनता पक्ष आहे. मोदी म्हणाले होते की ते रोज दोन-तीन किलो शिव्या खातात, मग त्यांचे हे तीनपाट आम्हाला काय रसगुल्ले देतात का? असा सवाल विचारल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  भाजपसह राणे कुटुंबावर चांगलीच टीका केली. आता निवडणुकीच्या तोंडावर भारताला विकसित करू असं सांगितलं जातंय, पण गेल्या दहा वर्षात तुम्ही काय गवत उXXX बसलं होतं का? असा सवालही त्यांनी केला. गुहागरमधील कार्यक्रमामध्ये (Uddhav Thackeray Guhagar Speech) ते बोलत होते. 


काय म्हणाले उद्धव ठाकरे? 


कोकणचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्र फिरतोय. शिवसेनाप्रमुख देखील तुमच्यासमोर नतमस्तक झाले होते. भाजपचे सध्या शीर्षसण सुरू आहे. भास्करराव, भाजपला उत्तर द्यायला जाऊ नका. विनायक राऊत यांना निवडून दिले नसते तर  किती गुंडा गर्दी झाली असती हे तुम्हाला माहिती आहे. मुख्यमंत्री असताना काय केले हे मी का सांगू? 


भाडोत्री जनता पक्षाने आपले सरकार गद्दारी करून पाडले. मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. पण मला ते पद स्वीकारावं लागलं. ज्यांनी तुम्हाला मोठे केले, तुमच्या मुलाबाळांची काळजी वाहिली त्यांनी एखादं पद स्वीकारलं तर काय झालं? 


शिवसेना ही चार अक्षरं त्यांच्या पाठी लागले नसते तर तुम्ही त्यांना विचारले असते? त्यांच्या शिवीगाळीला तुम्ही शिवीगाळीने उत्तर देऊ नका. आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या, त्यांच्या हिंदुत्वामध्ये शिव्या आहेत. भाजपचं नासलेलं, कुजलेल हिंदुत्व आहे, ज्याला आम्ही गोमूत्रदारी हिंदुत्व असे म्हणतो. माझा एकही शिवसैनिक मोदींना अपशब्द वापरून त्यांच्यावर टीका करत नाही. 


गुहागर मतदारसंघ ज्याप्रमाणे भास्कर जाधवांनी बांधला ते पाहून पूर्व विदर्भाची जबाबदार त्यांना दिली आहे. 


मधल्या काळात नरेंद्र मोदी बोलले होते की ते रोज तीन किलो शिव्या खातोय. मग मला त्यांना विचारायचं आहे की तुमची भोकं पडलेली तीनपाटं आम्हाला काहीही बोलतायत, ते काय रसगुल्ले आहेत का? ते बेलगाम बोलतात. आमच्यासोबत आमच्या कुटुंबाबद्दल खालच्या स्तरावर बोलतात. 


आम्ही खरे हिंदू आहोत. विदर्भात आपली लाट असून मोदी सरकारची वाट लागणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा भारतीय जनता पक्ष, तर आताचा भाडोत्री जनता पक्ष किंवा भाडखाउ जनता पक्ष आहे. भाजपने भ्रष्टाचारी अभय योजना काढली, ही मोदी गॅरंटी आहे. 


भाजपने 2024 साली म्हटलं की आम्ही देशाला विकसित करू, आताही तेच म्हणतात. मग गेली दहा वर्षे काय गवत उXXX बसला होता का? 


मासेमारी करायला गुजरातच्या एलईडी बोटी येत आहे. सगळंच गुजरातला नेत आहेत. मला गुजरातबद्दल राग नाही. गुजराती बांधवांच्या मदतीसाठीदेखील शिवसैनिक धावून जातो. निसर्ग आणि तोक्ते वादळात मोदी इकडे फिरकले नाहीत. केंद्राने देखील मदत केली नाही. 


काय म्हणाले भास्कर जाधव? 


भाजपच्या नेत्यांनी जी भाषा वापरली ती चुकीची भाषा होती. माझ्या मनात वेदना झाल्या, पण त्याबद्दल मी आता बोलणार नाही. जिल्ह्यात महिलांचे मेळाव्या घेऊन त्यांचं भाषण दाखवण्याचा प्रयत्न करणार. पण उद्धव ठाकरे परवानगी देणार नाहीत हे माहिती आहे. 


ही बातमी वाचा: