छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का दिला आहे. विशेष बाब म्हणजेच भाजपचे बडे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात असतानाच पक्षाचे सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. 


उद्धव ठाकरे यांनी भाजपाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का दिला आहे. सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी भाजपची साथ सोडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. दिनेश परदेशी यांचा आज मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश होणार आहे. हा कार्यक्रम दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. या प्रवेश सोहळ्याच्या अनुषंगाने बुधवारी पहाटेच डॉ. दिनेश परदेशी यांचे कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.  जवळपास दीडशेहून अधिक गाड्यांचा ताफा हा मुंबईच्या दिशेने निघाला  आहे. 


रमेश बोरणारे यांच्या विरोधात ठाकरेंची तयारी


शिवसेनेचे वैजापूरचे विद्यमान आमदार रमेश बोरणारे यांनी पक्षातील फुटीवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं रमेश बोरणारे यांच्या विरोधात विधानसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून वैजापूर मतदार संघाची तयारी सुरु आहे.  त्याचाच एक भाग म्हणून डॉ. दिनेश परदेशी यांच्या पक्षप्रवेशाकडे पाहिलं जातंय. 


कोण आहेत परदेशी?


1)1996 -2001 : पासून नगर परिषद, वैजापूर निवडणूक लढवून उपाध्यक्षपदी पाच वर्ष निवड भारतीय जनता पार्टी


2) 2001 - 2006 :- पासून जनतेतून निवडणूक लढवून नगराध्यक्षपदी पाच वर्ष निवड नगर परिषद, वैजापूर


3) 2006 - 2011 :- पासून नगर परिषद निवडणूक लढवून नगराध्यक्ष पदी पाच वर्ष निवड.


4) 2011 - 2016 :- पासून नगर परिषद वैजापूर निवडणूक, दिनेश परदेशी यांच्या पत्नी  शिल्पा परदेशी यांची पाच वर्षांसाठी नगराध्यक्षा पदी निवड 


5) 2017 - पासून जनतेमधून दिनेश परदेशी यांच्या पत्नी  शिल्पा परदेशी यांची पाच वर्षांसाठी नगराध्यक्षा पदी निवड


6) 2009 - वैजापूर विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढविली 41227 मते मिळाली.


7) 2014  मध्ये दिनेश परदेशी यांनी काँग्रेस कडून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळी त्यांना  45346 मतं मिळाली पण त्यांचा पराभव झाला.  त्या निवडणुकीत शिवसनेच्या आर.एम. वाणी यांना 47405 मतं मिळाली होती. राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगांवकर 52114 मतं मिळवत विजयी झाले होते. भाजपचे एकनाथ जाधव 24249 मतं मिळवत पराभूत झाले होते.  


8) 2018 पासून भारतीय जनता पार्टी संभाजीनगर लोकसभा सह संयोजक पदाची जबाबदारी


9) 1997 ते 2000 मध्ये  भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष


10) 2018 - पासून जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी संभाजीनगर


11) 2019 - पासून संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक औरंगाबाद जिल्ह्यात सार्वधिक मतांनी विजयी


इतर बातम्या :


Devendra Fadnavis: 'उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या, मग मदत करा'; देवेंद्र फडणवीसांचं मनोज जरागेंना आव्हान