Uddhav Thackrey on Devendra Fadnavis : मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. राज्यात निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्याच्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली आहे. फडणवीसांची मानसिक स्थिती स्थिर नाही, राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे. तसेच, सरकार बरखास्त करा, ताबडतोब निवडणुका आणि राष्ट्रपती  राजवट लागू करा, अशी मागणीही यावेळी उद्धव ठाकरेंनी केली आहे. 


ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "डोळ्यांसमोर जी बेबंदशाही सुरू आहे, यामुळे महाराष्ट्रातील जनता दुखवली गेली आहे. सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे. गणपत गायकवाड यांचा सीसीटीव्ही न मागता समोर आला. मी काल पोलिसांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, त्याच्याकडे परवाना धारक बंदूक नव्हती. आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही. गणपतीविसर्जनाच्या वेळी एका आमदाराने गोळीबार केला त्याला क्लिनचीट दिली. बोरीवली येथील आमदाराच्या मुलाने एकाचे अपहरण केलं त्यांच्यावर देखील काहीच झालं नाही. निखिल वागळे,असिम सरोदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मात्र, याबाबत पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही."


राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी जनतेला लिहिलेल्या पत्रावरुनही उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. रश्मी शुक्ला यांनी जनतेला का पत्र लिहलं? याआधी कधीचं असं पत्र लिहलं गेलं नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला आहे. 


राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलेत : उद्धव ठाकरे 


उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांची मानसिक स्थिती स्थिर नाही, राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभले आहेत, असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवर टिकास्त्र डागलं आहे. निर्ढावलेला निर्दय मानचा हा गृहमंत्री आहे, एखाद्या वक्तीचा मृत्यू होतो आणि तुम्ही त्यांची तुलना श्वानाशी करता? असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 


रकार लवकरच बरखास्त करा अन् राष्ट्रपती राजवट लागू करा : उद्धव ठाकरे 


पोलीसांना जर मोकळे हात दिले, तर गुंडांवर कारवाई होणार, आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही, कारण आम्हाला त्यांच्यावर विश्वास नाही. आता राज्यपाल पद राहावं की नाही असं वाटतं. हे सरकार लवकरच बरखास्त करावं आणि लवकर निवडणूक घ्यावी, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, आता सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयातूनच शेवटची अपेक्षा आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 


पाहा व्हिडीओ : Uddhav Thackeray : निर्ढावलेला, निघृण, निर्दयी मनाचा गृहमंत्री, फडणवीसांवर गंभीर आरोप



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Uddhav Thackeray: अभिषेक घोसाळकरांवर मॉरिसनेच गोळी झाडली का? उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला वेगळाच संशय