मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी कोकण दौऱ्यात भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीकास्त्र सोडले. ठाकरेंच्या याच टीकेला आता भाजपकडून (BJP) प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 'सत्तेसाठी सोनिया सेनेपुढे गुडघे टेकून भगव्याला छेद देण्याचं पाप कुणी केलं?, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर भाजपकडून हल्लाबोल करण्यात आला आहे. 


याबाबत भाजपने ट्वीट करत म्हटले आहे की, “मुख्यमंत्री असताना कोकणातील मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना निवडणुका तोंडावर असताना कोकणाची आठवण झाली. उद्धव ठाकरे तुम्ही फक्त भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, प्रत्यक्ष कृतीत मात्र तुम्हाला औरंग्याबद्दलचं प्रेम दिसून येतं. भाजपचं सुरूवातीपासून भगव्यावर प्रेम आहे आणि कायम राहणार. सत्तेसाठी सोनिया सेनेपुढे गुडघे टेकून भगव्याला छेद देण्याचं पाप कुणी केलं? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. देवेंद्रजींवर पाव उपमुख्यमंत्री म्हणून टीका करण्याआधी तुमच्या शिल्लक सेनेची काय अवस्था झाली ते बघा. सच्चा शिवसैनिकानं तुमची साथ कधीच सोडलीय. आता तुमच्याकडे पाव सेनाही उरलेली नसल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. 






काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? 


सावंतवाडीच्या सभेत बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, 'फडणवीसांना मला सांगायचं आहे की, तुम्ही पाव उपमुख्यमंत्री झाला. पुन्हा येईल, पुन्हा येईल घोषणा करतांना मोठे होता. पण आता तुम्ही त्यांना काय म्हणता (खालून कार्यकर्त्यांकडून टरबूज असा उल्लेख)...मी त्यांना असे म्हणत नाही. घोषणा करतांना काय होते आणि आता झाले चिराग, एवढा तो टरबूज आणि त्याचे झाले चिराग असे म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली होती. 


फडणवीसांनी केलेल्या रात्रीच्या करामतीमुळे त्यांचा पक्ष संपला...


एवढा सर्व करून देखील तुम्हाला काही पचत नाही. तरीही तुम्ही फोडाफोडीचे धंदे करत आहात. मी आजारी असतांना काही हालचाल करू शकत नव्हतो, तेव्हा तुम्ही हुडी वैगरे घालून रात्रीच्या ज्या करामती केल्या, त्याच आता तुमच्या पक्षावर उलटल्या आहेत. तुमचाच पक्ष संपला आहे. माझी शिवसेना आहे तितेच असून, आणखी फोफावली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. 


कोकणात शिवसेनेची मोठी ताकद 


आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता कोकणात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना नवी उमेद देणं यासाठी उद्धव ठाकरेंकडून कोकणाचा दौरा केला जात असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटात खूप मोठ्या प्रमाणात पडझड ही कोकणातल्या भागात झालेलीदिसून येत नाही. मात्र, कोकणात शिवसेनेची मोठी ताकद असल्याने ती कायम ठेवण्यासाठी ठाकरेंकडून प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Uddhav Thackeray : पंतप्रधान मोदी घराणेशाही नको म्हणातात, मग राणेंची घराणेशाही तुम्हाला चालते? राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा सवाल