सातारा : लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यावर सातारा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्र राजेंना कॅडबरी भेट दिली. उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना जी कॅडबरी दिली, त्या कॅडबरीवर I love you असं लिहिलं होतं. इतकंच नाही तर बाईट झाल्यावर उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंची पप्पी घेतली आहे. या दोघांमधील बंधूप्रेम सध्या चर्चेचा विषय बनला आहे.


उदयनराजे आणि शिवेंद्रराजे बंधूप्रेम


निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर उदयनराजे भोसले बुधवारी आमदार शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानी पोहाचले. उदयनराजे शिवेंद्रराजेंच्या घरी पोहोचले. उदयनराजेंना साताऱ्यातूनच मताधिक्य मिळाल्यामुळे उदयनराजेंचा विजय झाला आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंचे आभार माणण्यासाठीच उदयनराजे सुरूची बंगल्यावर पोहोचले. उदयनराजेंनी दोघांमधील कटूता निवडणूकीअगोदरच संपवली होती. 


आधी जादू की झप्पी नंतर घेतली पप्पी


उदयनराजे भोसले म्हणाले की, या निवडणुकीत पतंग जरी मी असलो तरी, माझा मांजा (शिवेंद्रराजे) चांगला होता, असंही उदयनराजे भोसले म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसलेंची पप्पी घेतली. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोघा भावांमधील प्रेम दिसून आलं आहे.


शिवेंद्रराजे नसते तर, निवडणूक अवघड झाली असती


उदयनराजे भोसले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, या जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघातून मनापासून काम केलं, त्यामुळं हे शक्य होऊ शकलं. आकडेवारी पाहिली तर निश्चित हे सांगेन शिवेंद्रराजे नसते तर, ही निवडणूक अवघड झाली असती. भविष्य काळात जेवढे आमदार, नेते असतील या सगळ्यांना विचारात घेऊनच वाटचाल होईल.


भविष्यात जिल्ह्यासाठी कुठेही कमी पडणार नाही


कधी-कधी प्रश्न पडतो, एवढी काम केल्यावर आज जो कौल लोकांनी दिला ते बघून प्रश्न पडतो, येवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधात कौल दिला, तो नेमका कशामुळे दिला. एवढंच सांगेन की, भविष्यकाळात या जिल्ह्याकरिता जे-जे करावं लागेल, त्यात कुठेही कमी पडणार नाही. माझ्याकडून काही त्रृटी राहिल्या असतील, त्या भविष्यकाळात भरून काढेन. 


शिवेंद्रराजेंना पुन्हा आमदार म्हणून निवडून आणणार


सातारा आणि जावळी याचा लीड कमी करण्याचं काम झालं, शिवेंद्रराजे आणि त्यांचे सहकारी यांनी धावपळ केली म्हणून मी निवडून आलो, याची जाणीव आहे. पुढील काळात आमदारकीची निवडणूक असेल, त्यात जीव तोडून काम करणार आणि हेच पुन्हा आमदार दिसणार.