Dombivli MIDC: डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्या स्थलांतरित होऊ देणार नाही, डोंबिवलीकरांना रसायनीकर होऊ देणार नाही, असा इशारा भाजप (BJP) आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिलाय. तसेच  सरकारनं डोंबिवलीतील कारखानं स्थलांतरीत करण्याचं घोर पाप सरकारनं करू नये, असंही आवाहन त्यांनी केलंय. 

Continues below advertisement


डोंबिवलीतील रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक 156  स्थलांतरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी लाखो कामगारांना बेरोजगार करणे हा त्यावरचा उपाय असू शकत नाही.सर्व उद्योजक डोंबिवलीकर आहेत त्यांना पाताळगंगा येथे स्थलांतरीत करून रसायनीकर होऊ देणार नाही .कारखाने स्थलांतरीत करण्याचे घोर पाप  सरकारने करु नये, असं आवाहन रविंद्र चव्हाण यांनी सरकारला केलंय.


रविंद्र चव्हाण यांची कारखानदारांसोबत चर्चा 
भाजपचे आमदार चवींद्र चव्हाण यांनी आज कामा कारखानदारी संघटनेच्या कार्यालयात कारखानदारांसोबत चर्चा केली. यावेळी कामाचे पदाधिकारी कारखानदार उपस्थित होते. आमदार चव्हाण यांनी कारखाने स्थलांतरीत करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध करीत कारखानदार आणि कामगारांच्या पाठीशी भाजप आहे, असं स्पष्ट केलं. आमदार चव्हाण यांनी कारखाने स्थलांतरीत करण्यास पाचशे ते एक हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. हा खर्च स्थलांतरावर करण्याऐवजी सरकारनं या खर्चाचा प्रदूषण रोखण्यासाठीचा डीपीआर तयार करावा, असंही चव्हाण यांनी म्हटलंय. 


कारखाने स्थलांतरीमुळं लाखो कामगार बेराजगार होतील
"नागपूर महापालिका दूषित पाण्यापासून चांगले पाणी तयार करते. त्या धर्तीवर प्रकल्प हाती घ्यावा. महापालिकेस आणि एमआयडीसीला ते शक्य नसल्यास सरकारनं त्यासाठी अनुदान द्यावे. प्रदूषण रोखण्यासाठी स्थलांतर हा उपाय होऊ शकत नाही. कारखाने स्थलांतरीमुळं लाखो कामगार बेराजगार होती. तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेले गॅरेज, कॅन्टीनवाल्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. प्रदूषण दूर झाले पाहिजे. डोंबिवली प्रदूषण मुक्त झाली पाहिजे. या मताशी आम्ही सहमत आहोत. त्यासाठी स्थलांतर हा उपाय होऊ शकत नाही. याठिकाणचा प्रत्येक कामगार आणि कारखाना मालक डोंबिवलीकर आहे. त्याला रसायनीकर व्हायचे नाही, असं आमदार चव्हाण यांनी सांगितलं.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha