Bhaskar Jadhav On Ajit Pawar: मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच छगन भुजबळांनी माध्यमांशी बोलताना सतत शा‍ब्दिक हल्ले केले. तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गायब होते. नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाला देखील अजित पवार अनुपस्थितीत राहिले. घशाला त्रास होत असल्याने डॉक्टरांनी अजित पवारांना विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. मात्र छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अजित पवारांनी माध्यमांपासून दूस राहणं पसंत केल्याची देखील राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली आहे.


मी अजित पवारांना खोगोची गोळी देणार- भास्कर जाधव 


अजित पवार आज हिवाळी अधिवेशनात देखील सहभागी होणार आहे. यावरुनच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. अजित दादा यांचा घसा खराब असल्याने मी त्यांना खोगोची गोळी देणार आहे, ती अजित पवारांनी घशात ठेवावी, असा मिश्किल टोला भास्कर जाधव यांनी लगावला. 


अजित पवार आज कार्यकर्त्यांना भेटले-


दरम्यान आज नागपुरात अदिती तटकरे यांनी अजित पवारांची भेट घेतली. दोन दिवसांपासून अजित पवार गायब असल्याच्या चर्चा असताना अदिती तटकरे आणि अजित पवारांच्या भेटीचा फोटो समोर आला. अजित पवारांना भेटण्यासाठी नागपूरच्या त्यांच्या बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी कोली होती. आज सकाळपासून अजित पवार कार्यकर्त्यांना भेटत आहेत.


छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आज नाशिकमध्ये मेळावा-


मंत्रीपद नाकारलेल्या छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आज नाशिकमध्ये मेळावा होत आहे. या मेळाव्याला राज्यभरातील समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भुजबळ समर्थक उपस्थित राहणार आहेत बीडहून समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राऊत नाशिक मध्ये पोहोचले आहेत छगन भुजबळ यांचा अपमान झालेला आहे त्यामुळे भुजबळ जी भूमिका घेतली ती मान्य असेल असा दावा त्यांनी केला आहे. आम्ही भुजबळ यांना काही सांगण्यापेक्षा ते काय निर्णय घेतात त्याला आमचा पूर्ण पाठींबा आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.



संबंधित बातमी:


Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळांचे शा‍ब्दिक हल्ले; अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!