नागपूर : शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray camp) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ललित पाटील (Lalit Patil drugs case) ड्रग्जप्रकरणावरुन पुन्हा एकदा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर हल्लाबोल केला."शंभूराज देसाई म्हणाले माफी मागा नाहीतर.... त्यांच्या "नाही तर" या शब्दाचा अर्थ काय? मला धमकी देत आहे का?" असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. त्या नागपुरात (Sushma Andhare Nagpur) बोलत होत्या.
शंभूराज देसाईंसोबत माझं वैयक्तिक वैर नाही. त्यांच्या खात्याशी संबंधित जर विषय असेल तर त्यांनाच विचारणार. राज्याचं उत्पादन शुल्क खातं शंभूराज देसाईंकडे आहे. तो विभाग सपशेल अपयशी आहे. मी जे काल बोलले, त्यामधून मी एक ही शब्द मागे घेणार नाही. माफी मागण्याचा तर प्रश्नच नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
ललित पाटील प्रकरणावरुन सुषमा अंधारेंनी दादा भुसे (Dada Bhuse) आणि शंभूराज देसाईंची (Shambhuraj Desai) नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. शंभूराज देसाई हे उत्पादन शुल्क मंत्री आहेत, त्यांची एक नाही तर असंख्य प्रकरणं बाहेर येत आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यावर सुषमा अंधारे यांनी आजही आपण वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
ललित पाटील पोलिसांच्या स्वाधीन झाला मी पळालो नव्हतो, मला पळवून लावलं असं तो म्हणाला. मी स्वतः शिक्षिका आहे, मला विद्यार्थ्यांची चिंता आहे.पुणे हे शिक्षेचे माहेरघर आहे.म्हणून मी पुण्याचा उडता पंजाब होऊ नये म्हणून हे मुद्दे उपस्थित करत आहे. मी जे काल बोलले, त्यामधून मी एक ही शब्द मागे घेणार नाही. शंभूराज देसाई म्हणाले माफी मागा नाही तर.... त्यांच्या "नाही तर" या शब्दाचा अर्थ काय?? मला धमकी देत आहे का? ससूनच्या (Sasoon Hospital) गेटवर दोन कोटींचे ड्रग्ज मिळत असेल तर हे चिंताजनक नाही का? कोर्ट परिसरात चरस मिळाले हे गंभीर नाही का? नाशिकमध्ये कोट्यवधींचा ड्रग्जचा कारखाना मिळाला, याचे तुम्हाला काहीही वाटत नाही का? असे सवाल सुषमा अंधारे यांनी शंभूराज देसाईंना विचारले.
भाजपवाल्यांनीही शंभूराज देसाईंना प्रश्न विचारले
माझ्यावर कोणाची उधारी नाही, मी कोणत्याही योजनेत लाभार्थी नाही.मी फक्त विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढत आहे. शंभूराज देसाईंना प्रश्न मीच विचारले नाही, तर सभागृहात तुम्हाला भाजपवाल्यांनीही प्रश्न विचारले आहेत. प्रवीण दरेकर, अंबादास दानवे, एकनाथ खडसे यांनी तुम्हाला प्रश्न विचारले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागात काही अधिकारी मंत्री शंभूराज देसाई यांच्या खास मर्जीतले आहेत. सुषमा अंधारे गरिबीतून आली आहे. ती वंचित घटकामधून आली आहे, म्हणून तिला भीती दाखवाल का शंभूराज देसाई? असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला.
देसाई साहेब बात निकलेगी तो दूर तक जाएगी
देसाई साहेब बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी.मी अभ्यासू आहे.संभाजीनगरमधील ज्या कंपनीने राज्याचे 143 कोटींचे महसूल बुडवले, त्या कंपनीची हियरींग तुम्ही तुमच्या दालनात बोलावली. काय कारण होते?
पुण्याचे एक्साईजचे अधिकारी चरणसिंग राजपूत यांनी बंद केलेली ताडी पुन्हा सुरू केली.का सुरू केली? याच राजपूतने अनेक दुकानदार मोफत दारू प्यायला देत नाही म्हणून मारहाण केली आहे.याच राजपूतने खोटे जात प्रमाणपत्र जोडून नोकरी मिळविली.हाच राजपूत नावाचा अधिकारी शंभूराज देसाई तुमचा लाडका आहे, असा गौप्यस्फोट केला.
प्रदीप शर्मा त्याच बराकीत आहे, ज्यात ललित पाटील होता. 9 - 10 महिने त्याच्यावर उपचार चालले. असे कोणते आजार झाले यांना? कर्करोग झाला तरी एवढं वेळ किमोथेरेपीला लागत नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
फडणवीसांनी राज्याचे गृहमंत्री आहेत हे विसरु नये
मी लढत आहे, साथ देणे सोडून मला धमकावत आहे... नवरात्र सुरू आहे... मी स्वतः ला दुर्गा नाही म्हणत.. पण मी लढत आहे. फडणवीस काल म्हणाले बोळणाऱ्यांची तोंड बंद होतील.. फडणवीस धमकी देत आहात का, काय करणार, कुठे अडकवाल.. फडणवीस विसरू नका, तुम्ही पक्षाचे नेते नाही, तुम्ही राज्याचे नेते आहे.
फडणवीस मी नेहमी भाऊ आणि वहिनी म्हणून सन्मान देऊन बोलते. मी तुमच्याकडे माहिती मागत आहे. तुम्ही धमकी देत आहात. फडणवीस धमकी देऊ नका..महाराष्ट्राचे उडता महाराष्ट्र होऊ नये हे माझे हेतू आहे. संध्याकाळी महाप्रबोधन यात्रेत आणखी काही मुद्दे मांडणार, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
नागपूर ना फडणवीसांचा, ना RSS चा बालेकिल्ला
मी फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात बोलायला आली आहे असे नाही.. नागपूर फडणवीस किंवा RSS चां बालेकिल्ला नाही, नागपूर बाबासाहेबांच्या ऊर्जेचा केंद्र आहे.
अमली पदार्थाबद्दल माझी लढाई माझ्या व्यक्तिक भावनेतून आहे.. मी ती लढत आहे.. माझा बोलवता धनी माझा पक्ष नाही... माझ्या मागे माझा पक्ष आहे की नाही हे माहीत नाही..काल माझ्या भावाचा अपघात झाला होता, म्हणून काल मी भावनिक होते, काल विमानात कोलॅप्स झाले होते.
आप का क्या होगा जनाबे आली
ललित पाटील पळून गेल्याच्या प्रकरणात जे कोणी पोलीस, स्कूल वाले, वाहन चालक सहभागी आहे त्या सर्वांची नार्को चाचणी झाली पाहिजे. मला मंत्र्यांनी मानहानीची नोटीस बजावली, तरी त्याच मंत्र्यांना माझे न्यायालयाचे पैसे भरावे लागतील. माझ्याकडे काहीच नाही. हिंदी चित्रपटाचं गाणं आहे "अपनी तो जैसे तैसे कट जायेगी, आप का क्या होगा जनाबे आली", असं म्हणत सुषमा अंधारे यांनी टोला लगावला.