Maharashtra Politics: राज्यात विधानसभा निवडणूकांचे (Vidhansabha Election) राजकीय पक्षांना वेध लागले असून महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा प्रश्न सुटत आला असून अजून २० ते २२ जागांचा तिढा कायम असल्याचं शिवसेना उबाठा गटाच्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या.  या जागांसाठी रस्सीखेच सुरु असून मराठवाड्यातील लातूर मतदारसंघातील जागांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट जागेसाठी मागणी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे मविआचा नक्की काय फॉर्म्यूला असणार हे पाहणं औत्सूक्याचं ठरणार आहे. लातूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.


विधानसभा निवडणूकांसाठी जागा वाटपाची चर्चा सुरु असून मविआतील घटकपक्षांशी वाटाघाटी सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी विधानसभेचा मविआचा फॉर्म्यूला नक्की कसा असणार हे ही त्यांनी सांगितलं.


कसा असणार मविआचा जागावाटपाचा फॉर्म्यूला?


महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अजून २० ते २२ जागांवर अजून असल्याचं शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. तर या जागांसाठी मविआची रणनिती कशी असणार हेही त्यांनी सांगितलं आहे. सीटींग आमदार ज्यांचा ती जागा तो पक्ष लढवणार हा महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला असल्याचं त्या म्हणाल्या. या न्यायानं लातूरमधील औसा मतदारसंघाची जागा शिवसेनेची असल्याचंही त्या म्हणाल्या. 


लातूरच्या दोन जागांसाठी मागणी


लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघासाठी आमची मागणी असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं असून लातूर जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर विधानसभांच्या जागांसाठीही आम्ही मागणी करतोय असं त्या म्हणाल्या. 


कृषीमंत्र्यांना नुकसानाच्या मदतीसाठी सवाल


राज्यात सध्या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, ४५ मिमीच्या वर पाऊस झाल्यानंतर सरसकट मदत देणार असं कृषीमंत्री म्हणतात. ती मदत शेतकऱ्यांना कधी देणार असा सवालही अंधारे यांनी केला. शेतमालाच्या दराप्रश्र्नी केंद्र आणि राज्य सरकारने धूळफेक केली असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी गृहमंत्र्यांच्या कक्ष पर्यंत सर्व सुरक्षा भेदून एखादी व्यक्ती पोहोचते कसे ? जर गृहमंत्र्यांचा कक्षेला सुरक्षा व्यवस्थित मिळत नसेल तर राज्यातील सर्वसामान्यांचे काय? असा सवालही त्यांनी केला.


हेही वाचा:


Rohit Pawar : भावी मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगलेली असतानाच रोहित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, जनतेचे प्रेम...


Pravin Tarde: 'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..