Sushma andhare on Devendra Fadnavis, बीड : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर आज (दि.27) एका महिलेने हल्ला करुन तोडफोड केली. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. बीडमध्ये सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर सवाल केले आहेत. 


सुषमा अंधारे काय काय म्हणाल्या? 


सुषमा अंधारे म्हणाल्या, गृहमंत्र्यांच्या कार्यालयावर हल्ला होतो, ही गंभीर बाब आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे राज्याची गरिमा आहे. गृहमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा असेल तर निश्चित ही चिंतेची बाब आहे. या निमित्ताने वेगळे प्रश्न निर्माण होतात. सुरक्षा भेदून अशा प्रकारे एखादी व्यक्ती येत असेल पोहोचते.  गृहमंत्र्यांना दगाफटका झाला असता तर? दुपारीच गृहमंत्री म्हणाले की, मी चक्रव्यूहात अडकलोय. कोणी टाकलाय हा चक्रव्यूह? असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. 


हमंत्र्याची सुरक्षा इतकी कमकुवत असेल तर इतर लोकांचं काय ?


पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयासमोर एक महिला येथे आणि अशी तोडफोड करतोय तर मग प्रश्न उपस्थित होतोय की गृहमंत्र्याची सुरक्षा इतकी कमकुवत असेल तर इतर लोकांचं काय ? हा प्रश्न निर्माण होतो गृहमंत्री सुरक्षित नसतील तर महाराष्ट्राच्या लेकी बाळीच्या सुरक्षा कोण देणार ? 


मी पक्षातच नसेल तर माझ्यामुळे पक्ष सोडला हे कारण कसं खरं असेल ?


धर्मवीर आनंद दिघे यांच्या विषयी माझ्या मनात मोठा आदर आहे. मात्र त्यांच्या नावाचा वापर करून काही लोक केवळ मतांसाठी फुकट चित्रपट काढला आहे. या चित्रपटामध्ये सहा मिनीट माझ्यावर खर्च केलेत असं मला कळलं. सुषमा अंधारे पक्षात आल्यामुळे मी गद्दारी केली असं एकनाथ शिंदे म्हणतात. पण माझा पक्षप्रवेश 28 जुलैला झाला गद्दारी झाली 21 जूनला जर या दिवशी मी पक्षातच नसेल तर माझ्यामुळे पक्ष सोडला हे कारण कसं खरं असेल ? असा सवालही अंधारे यांनी केला.


चित्रा वाघ यांचे विरोधकांना सवाल 


विरोधकांनी टीका केल्यानंतर चित्रा वाघ म्हणाल्या, आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर धिंगाणा घालणार्‍या महिलेची ओळख आता पटली आहे. ती बिचारी कुठल्यातरी मानसिक त्रासाने ग्रस्त आहे. तिचे जे व्हायचे ते होईल. पण, मला आता विरोधकांची कीव कराविशी वाटते. कुठलीही माहिती न घेता सकाळ झाली की बोंबा मारणार्‍यांनी आतातरी विचार केला पाहिजे. विरोधक मनोरुग्णांसारखे वागत आहेत का, याचे त्यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे.


इतर महत्वाच्या बातम्या  


Devendra Fadnavis : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली