Sushma Andhare : शिंदे साहेब तुम्ही महापुरुषांचं राजकारण केलं तुम्हाला एकही आंदोलन हाताळता आलं नाही, असे म्हणत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका केली. शिंदे साहेब तुम्ही ठरवून धार्मिक दंगली घडवून आणल्या. धार्मिक दंगली घडवायला शांतिगिरी महाराजाच्या पाठीशी उभे राहिलात असेही अंधारे म्हणाल्या. शिवाजी पार्क इथं आयोजीत करण्यात आलेल्या दसरा मेळाव्या त्या बोलत होत्या.
10 वर्षांपूर्वी 2014 मध्ये देवेंद्र फणवीसांनी आणि नरेंद्र मोदी यांनी इंदू मिलची कुदळ मारली होती. मात्र, गेल्या 10 वर्षात बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची एक वीट देखील रचली नाही असे अंधारे म्हणाल्या. याच्या उलट दीक्षाभूमीचं खोदकाम केलं. यांची अघोरी भूक संपत नाही. अरबी समुद्रातील स्मारक उभं केलं नाही असेही अंधारे म्हणाल्या. शिंदे साहेब तुम्ही छत्रपती शिवराय यांच्या पायाशी जाऊन शपथ घेतली असेही अंधारे म्हणाल्या.
विधानसभेला छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे तुम्हाला धूळ चारतील
लोकसभेच्या निवडणुकीला यांना रामाने चितपट केलं. विधानसभेला छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे तुम्हाला धूळ चारतील असे म्हणत सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस म्हणतात की, फेक नरेटिव्ह तयार केलं जात आहे. कसलं फेक नरेटिव्ह. फडणवीसंनी अंतकरणावर मनावर हात ठेवावा आणि सांगावं फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र तुम्ही स्वत: आहात असे अंधारे म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात माणसात माणूस ठेवला नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यात माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी फडवीसांना सल्ला द्यावा, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली. फडणवीसांनी राज्यात जातीय द्वेष पसरवला आहे. सरसंघचालकांनी त्यांचे कान उपटावेत असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला. आपण कधी बहिणीला पैसे दिले म्हणून बॅनर लावलेत का? आपल्याला नात्यांची किंमत कळते असेही सुषमा अंधारे म्हणाल्या. यांना बहिणीचे नाते कळत नाही. बाईपणावर हल्ले करता, हे संस्कार बाळासाहेबांचे असू शकत नाही ना ते आनंद दिघेंचे आहेत असेही अंधारे म्हणाल्या. तुमचे हे संस्कार रेशीमबागेतील आरएसएसच्या बाटगेंचे असू शकतात. न्याय तुम्ही अत्याचार झालेल्या महिलेला देऊ शकत नाही असेहगी अंधारे म्हणाल्या.