Supriya Sule On Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष (NCP Ajit Pawar Group) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ((NCP Sharad Pawar Group) ) पुण्यात आपला 26 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ध्वजारोहणाने वर्धापन दिन सोहळ्याला सुरुवात होईल. मात्र हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन सोहळा सुरु होण्याआधीच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या मोठं विधान केलं आहे.
आमच्या गटातल्या काही लोकांना सत्तेत जावं वाटतं, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आहे. या मेळाव्याआधी आता सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. सहन करायला शिका, असं सुप्रिया सुळेंनी स्टेटस ठेवलं होतं. यावर आज सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिलं. माझ्या आईने मला सल्ला दिला तो मी माझ्या व्हॉट्सअॅप स्टेट्सला ठेवला, ते माझं वयक्तिक आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवारांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
आज महत्वाची घडामोड घडणार?
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने देखील पुण्यातच वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन केलं असून दुपारी तीन वाजता बालेवाडी ग्राऊंड येथे हा सोहळा पार पडेल. यासाठी पक्षाचे सर्व मंत्री आमदार खासदार, माजी खासदार उपस्थित असणार आहेत. मागील काही दिवसांपासून सातत्याने दोन्ही राष्ट्रवादी एक होणार अशा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे या अनुषंगाने काही महत्त्वाची घडामोड घडते का?, हे पाहणं महत्त्वाचं राहील.
पवारांच्या बदलत्या भूमिका-
2014 रोजी- भाजप सत्तेत.मागणीशिवाय राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा. विश्वासदर्शक ठरावावर भाजपला मतदान केल्याचं तटकरे,पटेलांचं वक्तव्य'दोन महिन्यानंतर सत्तेत जाऊ' असा कोअर कमिटीचा निर्णय
2016-2017 रोजी- राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार अशी पुन्हा चर्चाशरद पवार आणि अमित शाह यांची भेट मंत्रिपदं आणि महामंडळांच्या वाटपावरही चर्चा 'शिवसेना बाहेर पडेल, राष्ट्रवादी सत्तेत जाईल' अशी चर्चाराष्ट्रवादीला सोबत घेण्यास अमित शाहांचा नकार
2019 रोजी- शिवसेनेचा भाजपसोबत न जाण्याचा निर्णयमविआच्या स्थापनेचे प्रयत्न,भाजपसोबत जाण्यावरही चर्चाभाजपसोब मंत्रीपदं,महामंडळाचं वाटपही निश्चितअखेरच्या क्षणी पवारांची भाजपऐवजी मविआला पसंतीअजित पवार भाजपच्या गोटात,पण प्रयोग अयशस्वी
2022 रोजी- मविआला सुरुंग लावत एकनाथ शिंदे सत्तेतून बाहेरशिंदेंऐवजी आम्हाला सोबत घ्या असा राष्ट्रवादीचा प्रस्तावअजित पवार व समर्थकांचे भाजपला द्यायचे पत्रही पवारांना देण्यासाठी तयारभाजपचा मात्र शिंदेसोबतच जाण्याचा निर्णय
2023 रोजी-ईडीच्या कारवायांमुळं पक्षनेते त्रस्तभाजपसोबत गेले पाहिजे अशी अनेकांची पवारांना गळ२ मे रोजी पवारांची पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणासुप्रियांना अध्यक्ष करून केंद्रात पाठवावे,राज्यात अजित पवारांना ठेवावे असा निर्णयकाही महिन्यात सत्तेत सहभागी व्हावं असाही निर्णयपवारांनी राजीनामा मागे घेतल्यानं पक्ष फुटीच्या वळणावर पोचला
जुलै 2023 रोजी- राष्ट्रवादीमध्ये फूटअजित पवारांचा गट भाजप सरकारमध्ये सहभागी
2023 रोजी- उद्योजक चोरडियांच्या घरी अजित पवार-शरद पवारांमध्ये बैठकराष्ट्रवादी एक होणार यावर चर्चा झाल्याची माहिती
मे 2025 रोजी- इंडियन एक्सप्रेसला शरद पवारांची मुलाखत'आमच्या गटातल्या काही लोकांना सत्तेत जावं वाटतं'असं वक्तव्यदोन्ही गट विलीन होण्याची चर्चा