Supriya Sule on Mahadev Munde Case : स्वर्गीय महादेव मुंडे प्रकरणात (Mahadev Munde Case) अतिशय गलिच्छ स्टेटमेंट येत आहे, हे चुकीचे आहे. देशमुख कुटुंबाचे वास्तव समोर आले, त्यानंतर काय झाले हे पाहिले. राजकीय मतभेद माणुसकीच्या नात्याने बाजूला ठेवले पाहिजे. या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. सुषमा अंधारे (Sushma andhare), मेहबूब शेख वास्तव समोर आणत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना (Devendra Fadnavis) माझी हात जोडून विनंती आहे कि यात कोणालाही चौकशी आधी क्लीनचिट देऊ नये. ती कुणाची तरी ती लेक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. निवृत्त न्यायाधीश आणि राजकीय हस्तक्षेप न करता न्याय मिळावा, यासाठी SIT स्थापन करावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.
Supriya Sule : बीडमध्ये जाऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेणार
खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना फोन केलाय. दरम्यान त्या आज बीडमध्ये जाऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेणार आहे. 31 जुलै रोजी या प्रकरणात आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास गेले तीन महिन्यापासून एसआयटी करत आहे आणि याच बाबतीत सुप्रिया सुळे मुंडे कुटुंबीयांकडून माहिती घेण्याची शक्यता आहे. अद्याप या प्रकरणात आरोपी निष्पन्न झाले नाहीत, या प्रकरणाचा तपास एसआयटी कडून अद्याप सुरूच आहे.
Supriya Sule On Amit Shah : महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे, अमित शाहांना माहिती देऊ
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील याची माहिती देणार आहोत. महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही या कुटुंबा सोबत आहोत. महादेव मुंडे यांच्या पत्नीची आज आम्ही भेट घेणार आहोत. या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव नसला पाहिजे. जो गलत है वो गलत हैं. आम्ही दिल्लीत याच पाठपुरावा करू. सीडीआरचे रिपोर्ट लीक कसा झाला? महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण कुठून सुरू झालं? हे तपासलं पाहिजे. यात राजकीय दबाव येऊ देणार नाही. जो कोणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या