Sunil Tatkare, रायगड : "पुण्यातील हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे त्रास झाला कारण ते चालवणारे कॅप्टन आणि त्यांची टेक्निकल टीम यांच्यासोबत त्याच्या आदल्या दिवशी प्रवास केला होता. तेच हेलिकॉप्टर मला सोडायला परळीला आले होते. दुर्दैवाने ती मंडळी आज माझ्या सोबत नाहीत. आम्ही निवडणुकीसाठी एका कंपनीकडून हेलिकॉप्टर घेतले होते. आता अपघात कसा झाला याबाबत योग्य तो तपास केला जाईल", असं म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी पुण्यातील हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबाबत हळहळ व्यक्त केली. ते रायगडमध्ये बोलत होते.
शिवसेना 70 जागा आणि राष्ट्रवादी 40 जागा अशा प्रस्तावाची चर्चा म्हणजे निव्वळ जोक
सुनील तटकरे म्हणाले, सध्या शिवसेना 70 जागा आणि राष्ट्रवादी 40 जागा असा प्रस्ताव आहे अशी चर्चा ऐकली हा निव्वळ जोक आहे. अमची खूप चांगली चर्चा सुरू आहे. आम्ही आता पुन्हा राज्य पातळीवर चर्चा करणार आहोत. कमी जागा अशा आहेत त्याचं प्रश्न बाकी आहे. जागा किती मिळणार किंवा लिस्ट कधी जाहीर करणार याबाबत येत्या 2 दिवसांत बैठक होऊन निर्णय होईल. याचं टाईम टेबल ठरेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कोणताही विद्यमान आमदार जाणार नाही
पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, हर्षवर्धन पाटील भाजप नेते आहेत. त्यांच्या वरिष्ठ पातळीवर पाटील यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कोणीही विद्यमान आमदार जाणार नाही. अजून 8 दिवसांनंतर तिकडून इकडं येणारं चित्रं पाहायला मिळेल. मुंबईसह महाराष्ट्रातून अनेकजण येताना पाहिला मिळतील.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश यांच्या समोर सुनावणी सुरू आहे. प्राथमिक सुनावण्या आत्तापर्यंत झाल्या असतील. शेवटी काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे. विधानपरिषद आमदारांबाबत काय निर्णय आहे हा नजरे समोर ठेऊन कारवाई केली जाईल, असंही तटकरे यांनी सांगितलं. 13 तारखेला आचारसंहिता जाहीर होईल असं असेल तर आम्ही तयारीला लागलो आहे, असंही तटकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या