पुणे : शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या मुलाविरुद्ध एका महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर तिच्याविरुद्ध विरोधकांकडून शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सिद्धांत शिरसाट यांनी आपल्याला धमकावून आणि बळजबरीने आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सिद्धांत यांनी आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला, असा आरोप या महिलेने केला आहे. विशेष म्हणजे या महिलेनं राज्य महिला आयोगाकडे तक्रार करुन देखील त्याची दखल घेण्यात आली नसल्याचे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाटने राजीनामा द्यायला हवा, तरंच या प्रकरणात योग्य ती कारवाई होईल, अशी मागणी देखील अंधारे यांनी केली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरात अनेक हुंडाबळी, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रकार समोर येत आहेत. दुर्देवी बाब म्हणजे यात सत्ताधारी मंत्र्यांच्या घरातील महिला आता त्यांच्यावर होत असलेले अत्याचार समोर येऊन बोलत आहेत. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने ज्या पद्धतीने अत्याचार केलेले आहेत त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. संजय शिरसाटने राजीनामा द्यायला हवा, तरंच या प्रकरणात योग्य ती कारवाई होईल. सिद्धांत शिरसाटच्या पत्नीने अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा राज्य महिला आयोगाने दखल घेतली नाही. विशेष म्हणजे तिने मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली होती.
राजीनामा मागण्यात नेहमी भाजप आघाडीवर
सुषमा अंधारे म्हणाल्या, हे फारच गंभीर आहे. सत्ताधारीच महाराष्ट्रातील लेकी-बाळींवर हात टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर अत्यंत अश्लाघ्य आहे. मला एक गोष्ट आठवते की, संजय राठोड यांच्यावर आरोप झाले तेव्हा राजीनामा मागण्यात भाजप आघाडीवर होती. भाजपच्या मंत्रिमंडळात आता संजय शिरसाट आहेत. शिरसाट सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हे प्रकरण दाबू पाहातात. आता अशा संजय शिरसाटांना मंत्रिमंडळात ठेवायचं का? संजय शिरसाटांना मंत्रिमंडळात ठेवायचं का? हे देवेंद्र फडणवीसांनी ठरवावं, असेही अंधारे यांनी म्हटलं होतं.
प्रिया फुकेचंही महिला आयोगाला पत्र
विद्यमान आमदार आणि माजी मंत्री परिणय फुके यांच्या भावजय प्रिया फुके यांनी देखील महिला आयोगाकडे तक्रार केली होती. सन 2024 मध्ये केलेल्या या तक्रारीवर देखील काहीही झालेलं नाही. प्रिया फुके हिने तिच्यासोबत जे काय घडलंय ते या कुटुंबाकडून लपवण्यात आलेलं होतं, ते सगळं लिहून महिला आयोगाला सात पानी पत्र पाठवलं होतं. मग, महिला आयोगाचं काम काय असतं, फक्त मेल करणे का? असा सवाल सुषमा अधारे यांनी उपस्थित केला आहे.
तटकरेंनी बहिणीली पाठीशी घालू नये
सुनील तटकरे यांनी यांच्या लाडक्या बहिणीला (रूपाली चाकणकर) पाठीशी घालू नये. इतर ज्या बहिणी आहेत ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांच्या घरी ते आतापर्यंत कधी गेले आहेत का? असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा
बीडमध्ये तरुणाचे अपहरण, झाडाला बांधून मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, 7 जणांना अटक