Amit Shah : काही जण म्हणतात मोदींनी काय केलं? तर जीडीपी 10 नंबरवरून 4 नंबरवर आणला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरचं महत्व सगळ्या जगाला दाखवलं, सगळ्यात जास्त सिंदूर हा शब्द गुगवलवर सर्च केला. 10 कोटी लोकांनी हा शब्द सर्च केला. तरीही अजून सिंदूरचं महत्व त्या लोकांना कळालेलं नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. माधवबाग येथील लक्ष्मी-नारायण मंदिराच्या 150 व्या उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अमित शाह म्हणाले की, 150 वर्ष एक संस्था चालवणं सोपं नाही. मी जुन्या संस्था चालवल्या आहेत. इथ मुंबईत एवढी मोठी संस्था चालवणं सोपं नाही, त्यामुळे माधवबागच्या ट्रस्टींचे मी अभिनंदन करतो. देवेंद्र फडणवीस म्हणाले करोडो रुपयांचं दान करण्यात आलं. आज जर त्याची किंमत केली तर ते अरबो रुपये किंमत होईल. 1875 साली इंग्रजांचे सरकार असताना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी धार्मिक संस्था उभ्या करणे सोपे नव्हते. अनेकांना माहिती नसेल माझा जन्म मुंबईचा आहे. मी या मंदिरात अनेकवेळा आरतीसाठी येत होतो. त्यावेळी याठिकाणी एक वाडा होती आणि एक हॉल होता. त्यावेळी कमी पैशात याठिकाणी लग्न लावलं जात होतं. संस्था मदत करत होती. याठिकाणी अनेक प्रकारचे सामाजिक कार्यक्रम होत होते. याठिकाणी असणारी मूर्ती ही अतिशय उत्तम आहे. शास्त्रोक्त पद्धतीने याठिकाणी पूजा होत आहे. माझा वैष्णव कुटुंबात जन्म झाला आहे. याठिकाणी एक संस्कृत शिकवणारी शाळा होती, असे त्यांनी म्हटले.
गुजराती, मारवाडी संस्कृतीचे केंद्र माधवबागने बनवावे
अमित शाह पुढे म्हणाले की, 150 वर्ष जुन्या संस्थेने मध्यमवर्गीच्या अडचणी दूर केल्या. याठिकाणी आपली मातृभाषा शिकवणारे केंद्र बनवू शकते. कारण आता आपण गुजराती, पंजाबी, हिंदी कोणत्याही कुटुंबात जा. मातृभाषेपेक्षा इंग्रजी बोलणारे लोक जास्त भेटतात. माझ म्हणणं आहे की, इथे आपण आपली मातृभाषा शिकवणारे केंद्र बनवू शकतो. गुजराती, मारवाडी संस्कृतीचे केंद्र माधवबागने बनवावे. आपल्या पूर्वजांनी संस्थेला खूप संपत्ती दिली आहे. कोणत्याही प्रकारच्या मदतीशिवाय आपण याठिकाणी काम करू शकते, असेही त्यांनी म्हटले.
मोदींनी भारताला दहाव्या स्थानावरुन 4 नंबरला आणलं
काही जण म्हणतात मोदींनी काय केलं? तर जीडीपी 10 नंबरवरून 4 नंबरवर आणला. आपली सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केला त्यांना आपण सडेतोड उत्तर दिले. आपली सुरक्षा आता भक्कम झाली आहे. आपण आतंकवाद्यांना सडेतोड उत्तर देऊ शकलो. मला फ्रेंच डिप्लोमेट भेटले. मी त्यांना विचारलं 10 वर्षात भारतात काय बदललं? असं तुम्हाला वाटतं. ते मला म्हणाले की, मोदींनी पासपोर्टची किंमत वाढवली. कोणत्याही देशात जा, आपलं हसत हसत स्वागत केलं जातं. साडे पाचशे वर्ष भगवान राम तंबूमध्ये होते, त्यांना मंदिरात आणण्यात आलं. काशी विश्वेश्वर कॉरिडोर बनवलं. योगा आणि आयुर्वेद जगभरात घेऊन गेले. हे सगळे परिवर्तन मोदींनी केले. देशाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, असेही अमित शाह म्हणाले.
10 कोटी लोकांनी सिंदूर शब्द सर्च केला
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरबाबत देखील अमित शाह यांनी भाष्य केले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरचं महत्व सगळ्या जगाला दाखवलं, सगळ्यात जास्त सिंदूर हा शब्द गुगवलवर सर्च केला. 10 कोटी लोकांनी हा शब्द सर्च केला. तरीही अजून सिंदूरचं महत्व त्या लोकांना कळालेलं नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
आणखी वाचा