Sunetra Pawar on Ajit Pawar : कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मुख्यमंत्री व्हावेत. तुम्ही दादा मुख्यमंत्री व्हावेत असे तुम्हाला वाटतं का? असा सवाल विचारला असता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, ही कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण होवो, अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे. सुनेत्रा पवारांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत स्वागत केलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीत सुनेत्रा पवार पायी चालत आहेत. यावेळी त्या बोलत होत्या. 


अजित पवार चार वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री, मात्र मुख्यमंत्रि‍पदाने हुलकावणी दिली


महाराष्ट्राचे चार वेळेस उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे. मात्र, आजवर त्यांना मुख्यमंत्रिपद मिळवता आलेलं नाही. 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या होत्या. मात्र, शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद घेतलं नाही, अशी टीका अजित पवारांनी वारंवार केली आहे. अजित पवारांसोबत गेलेला गट सातत्याने शरद पवारांवर या पद्धतीचे आरोप करत आहेत. 


शरद पवारांशी फारकत पण लोकसभा निवडणुकीत अपयश 


अजित पवारांनी जुलै 2023 मध्ये शरद पवारांशी फारकत घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीमधून दोन पक्ष तयार झाले. मात्र लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना अपयश आलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा लढवल्या आणि 8 जागांवर विजय मिळवला. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी 4 जागा लढवल्या आणि केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. शिवाय विशेष म्हणजे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Sunil Shelke and Suresh Mhatre : आम्ही दोघं स्वतंत्र पक्षात, पण आमचं प्रेम वेगळं; शरद पवारांच्या खासदाराला अजितदादांच्या आमदाराने निवडून आणलं