Sujat Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे पुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. अमरावतीतील वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमताने याबाबतचा ठराव  मंजूर केला आहे. शिवाय, अमरावतीच्या (Amravati Lok Sabha) पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीकडे हा प्रस्ताव पाठवलाय. 


महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये जागावाटपावरुन खलबतं सुरुच


गेल्या दोन आठवड्यांपासून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जागावाटपावरुन खलबतं सुरु आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाने वंचितला 5 ते 6 जागा देण्यास सहमती दर्शवली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचितला केवळ 3 जागा देण्यात याव्यात, असं मत व्यक्त केलं आहे. 


एकीकडे जागा वाटपावर चर्चा दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस नेत्यांवर संशय


वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शुक्रवारी (दि.9) कोल्हापुरातील इचलकरंजी येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी पीएम मोदींवर टीका केली. शिवाय, यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेसचा एक माजी मुख्यमंत्री पक्ष सोडून गेलाय आणि एक निवडणुकीच्या अगोदर किंवा नंतर जाईल आणि राज्यपाल पद मिळवेल, असा संशय त्यांनी व्यक्त केला. 


हरणाऱ्या जागा आम्हाला देण्याचा महाविकास आघाडीचा डाव 


ज्या जागांवर होईल, असे महाविकास आघाडीला वाटत आहे, त्या जागा आम्हाला देण्याचा महाविकास आघाडीचा हेतू आहे. हरणाऱ्या जागा आम्हाला द्यायच्या आणि उर्वरित जागांवर वंचितच्या लक्षणीय मतदारांचा पाठींबा मिळवायचा हा हेतू महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा आहे, असे वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी म्हटलं होतं. त्यांनी एक पत्र लिहून महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली. 


वंचित बहुजन आघाडीला सन्माजनक आणि जिंकणाऱ्या जागा द्याव्यात. महाविकास आघाडीला टाकाऊ वाटणाऱ्या जागा आम्हाला नको आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी दोन्हीही पक्ष विभाजीत झालेले आहेत. शिवाय, काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यासह अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीने सक्षण राजकीय शक्ती म्हणून पाहणे महत्वाचे आहे, असंही ठाकूर यांनी पत्राद्वारे नमूद केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Pankaja Munde : लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, मी पुढे तुमची काळजी घेते; जिल्ह्यातील नेत्यांसमोर पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य