Subhash Deshmukh on Praniti Shinde : "आपल्या घरी प्रणिती शिंदे येत असतील तर सावध राहा. आत्ताची मैत्री, तुमच्या घरी जेवण, चहा हा केवळ देखावा आहे. ती खरी मैत्री नाही. विरोधक लोकांना सांगतात की, सरकार आले की संविधान बदलले जाणार आहे. पण 90 टक्के लोकांना संविधान काय आहे?  हे माहिती नाही",अशी टीका भाजप नेते सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर केली. ते सोलापुरातील सभेत बोलत होते. 


सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) म्हणाले, भाजपचे लोकसभा उमेदवार राम सातपुते हे ऊसतोड कामगाराचे पुत्र आहेत. मी देखील सिद्धेश्वर साखर कारखान्यावर मुकादम म्हणून काम केले आहे. मतदारसंघात सध्या भावी आमदार म्हणून डिजिटल लागतात ते पाहून बरे वाटते. आपल्या तालुक्याने मुख्यमंत्री दिला आहे. तो काळ पहा आणि मागील दहा वर्षातील आपल्या तालुक्याचा विकास पाहा. 


90 टक्के लोकांना संविधान माहिती नाही


पुढे बोलताना सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) म्हणाले, आपल्या घरी कोणी (प्रणिती शिंदे) येत असेल तर सावध राहा. आत्ताची मैत्री, जेवण, चहा हा केवळ देखावा आहे. ती खरी मैत्री नाही. अमुक याच्या घरी जायचे, निवडून यायचे आणि निवडून आले की तुमचे आमचे काही नाते नाही. आपल्या तालुक्यातील लाभार्थ्यांना भेटा आणि त्यांना लाभ कोणामुळे मिळाला हे सांगा.  विरोधक लोकांना सांगतात की, सरकार आले की संविधान बदलले जाणार. पण 90 टक्के लोकांना संविधान काय आहे हे माहिती नाही, असा दावा सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी केला. 


10 वर्षांपूर्वी आतंकवादी येत होते, हल्ले करत होते


देशमुख (Subhash Deshmukh) म्हणाले, मुस्लिम लोकांना सांगायचे की, पुन्हा भाजप सरकार आले तर तुम्हाला उभे कापतील, असे खोटे सांगितले जात आहे.  10 वर्षांपूर्वी आतंकवादी येत होते, हल्ले करत होते, मात्र मागील दहा वर्षात किती हल्ले झाले?  मुळात काँग्रेसला देश असुरक्षित ठेवायचा आहे. आपल्याला काँग्रेसमुक्त तालुक्यापेक्षा भाजपयुक्त तालुका करायचा आहे. त्या पक्षातील कोणी येणार असेल तर त्याला आपल्या पक्षात घ्या, असं आवाहनही सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी केलं.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Ramesh Baraskar : लग्नापासून 'वंचित' असलेल्यांना आंबेडकरांच्या माढ्यातील उमेदवाराची खास ऑफर, म्हणाला, निवडणुकीत मतं द्या, मग...