धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे काही निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत, त्याचा फटका बसल्याने आपला निवडणुकीत पराभव झाल्याचं माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) म्हणाले. सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात लीड घेऊनही एका मतदारसंघात मोठा फटका बसल्याने पराभव झाला असंही ते म्हणाले. सुभाष भामरेंनी या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी त्यांचे आभारही मानले. 


डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, धुळे लोकसभा मतदारसंघातून आपण दुसऱ्यांदा निवडणूक लढवली. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला. तसेच कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनतदेखील घेतली. धुळे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघातून आम्हाला प्रचंड मताधिक्य मिळाले. मात्र एकाच विधानसभा मतदारसंघातून मतदान मिळाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहितासाठी घेतलेले निर्णय विशिष्ट लोकांना आवडलेले नाहीत. कलम 370, तीन तलाक रद्द करणे यासारखे घेतलेले निर्णय हे चुकीचे होते का? हे कुठेतरी थांबायला हवं. 


धुळ्यात चुरशीच्या लढतीत भामरेंचा पराभव


निवडणुकीच्या सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटणाऱ्या धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र नंतर मात्र पूर्ण बदलले. 'एमआयएम'ने उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा देणे, वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद होणे, यामुळे या मतदारसंघात काँग्रेसने आव्हान निर्माण केले होते. भाजपचे डॉ. सुभाष भामरे व काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात चुरशीची लढत झाली. सुरुवातीला डॉ. सुभाष भामरे हे आघाडीवर होते. मात्र, नंतर शोभा बच्छाव यांनी आश्चर्यकारकरीत्या सुभाष भामरे यांच्यावर आघाडी घेतली आणि शोभा बच्छाव यांचा धुळे लोकसभा मतदारसंघातून विजय झाला. 


उत्तर महाराष्ट्रात भाजपला फटका


उत्तर महाराष्ट्रात महायुतीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर महाविकास आघाडीने सहा जागांवर कब्जा केला आहे. 2019 सालच्या निवडणुकीत भाजपला सहा जागा तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या होत्या.


विधानसभा मतदार संघनिहाय मतदान


धुळे ग्रामीण 


शोभा बच्छाव : 76 हजार 266


सुभाष भामरे : 1 लाख 40 हजार 505 


धुळे शहर 


शोभा बच्छाव :  88  हजार 438


सुभाष भामरे : 93 हजार 262 


शिंदखेडा 


शोभा बच्छाव : 68 हजार 424


सुभाष भामरे : 1 लाख 11 हजार 849 


मालेगाव मध्य 


शोभा बच्छाव : 1 लाख 98 हजार 869


सुभाष भामरे : 4 हजार 542


मालेगाव बाह्य 


शोभा बच्छाव : 72 हजार 242


सुभाष भामरे : 1 लाख 27 हजार 454 


बागलाण 


शोभा बच्छाव : 78 हजार 253 
सुभाष भामरे : 10 हजार 166 


पोस्टल 


शोभा बच्छाव : 1 हजार 374 
सुभाष भामरे : 2 हजार 257 


एकूण मते 


शोभा बच्छाव : 5 लाख 83 हजार 866


सुभाष भामरे : 5 लाख 80 हजार 35


ही बातमी वाचा: