Sonia Gandhi Summoned By ED: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात 21 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. तत्पूर्वी या प्रकरणी ईडीने काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांची सलग चार दिवस चौकशी केली होतो.








यापूर्वी सोनिया गांधी 8 जून रोजी ईडीसमोर हजर होणार होत्या. मात्र कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यानंतर त्यांनी ईडीकडे हजर राहण्यासाठी 4 आठवड्यांचा कालावधी मागितला होता. ज्याची मुद्दत 22 जुलै रोजी संपत आहे.


राहुल गांधी यांच्या चौकशीला काँग्रेसचा विरोध 


ईडीने राहुल गांधींची चार दिवस चौकशी केली. यावेळी प्रियांका गांधीही राहुल यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात गेल्या होत्या. ईडीकडून राहुल यांची सलग होत असलेल्या चौकशीला काँग्रेसने विरोध दर्शवला होता. खासदार राहुल गांधी यांना अशा प्रकारे त्रास देता येणार नाही, असे त्यावेळी काँग्रेसने म्हटले आहे.


काय आहे प्रकरण?


भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 'नॅशनल हेराल्ड' हे वर्तमानपत्र सुरू केले होते. हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं. मात्र 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांच्या 'यंग इंडिया' या कंपनीने या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. मात्र हे सुरु करण्यात आलं नव्हतं. हे हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


World Population Day: लोकसंख्या वाढीत वर्षभरात भारत चीनला मागे सारणार; UN चा नवा अहवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी यांना दिलासा कायम, मानहानीच्या खटल्यात 28 जुलैपर्यंत हायकोर्टातील सुनावणीला स्थगिती