Sindhudurg News : "26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचं (Saamana Editorial) कात्रण जपून ठेवलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) याला पुन्हा जेलचा (Jail) रस्ता दाखवणार. 100 दिवस जेलमध्ये जाऊन बाहेर आलाय ना. त्याला पुन्हा जेलवारी घडवणार," असा इशारा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी सिंधुदुर्गातील (Sindhudurg) कणकवलीमधील एका कार्यक्रम दरम्यान दिला आहे. कणकवली पर्यटन महोत्सव 2023 मध्ये (Kankavali Tourism Festival 2023) नारायण राणे बोलत होते.


संजय राऊतला सोडणार नाही : नारायण राणे


"माझ्याकडे कात्रण आहे, मी वकिलाकडे पाठवून ठेवलंय. मी असं वाचून विसरणारा नाही, दखल घेणारा आहे. वाईट स्वभाव आहे माझा. 26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण जपून ठेवलं आहे. संजय राऊतला सोडणार नाही. ती त्याच्यावर केस करणार आहे. 100 दिवस कमी वाटले म्हणून त्याला वाटलं परत जावं. म्हणून रस्ता मोकळा करतोय परत जायला," असं नारायण राणे म्हणाले. 


26 डिसेंबरच्या सामनातील अग्रलेखात काय लिहिलं होतं?


ठग-पेंढाऱ्यांचे राज्य! या मथळ्याखाली 26 डिसेंबरचा अग्रलेख प्रकाशित झाला होता. यात नारायण राणेंचा उल्लेख न करता म्हटलं होतं की, "सिंधुदुर्गात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. या तिन्ही खुनांच्या तपासासाठी श्री. फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर कोकणातले 100 सांगाडे पुरावे म्हणून त्या एसआयटीसमोर स्वत:च हजर होती. पण श्रीमान फडणवीस ते करणार नाहीत. ढेकणासंगे हिराही भंगला अशी त्यांची गत झालेली दिसते."


संजय राऊत 102 दिवस तुरुंगात


मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणाच्या आरोपांप्रकरणी ईडीने खासदार संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी विशेषे पीएमएलए कोर्टाने दिलासा देत त्यांना जामीन मंजूर केला. संजय राऊत तब्बल 102 दिवस तुरुंगात होते. जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत यांची मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. विशेष पीएलए कोर्टाने आपल्या जामीन ऑर्डरमध्ये ईडीबद्दल मोठे खुलासे केले होते. संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर होती, असं कोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये स्पष्ट म्हटलं होतं.


VIDEO : Narayan Rane On Sanjay Raut : 'संजय राऊतांना पुन्हा तुरूंगाचा रस्ता दाखवणार' , नारायण राणेंचा इशारा



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI