Maharashtra Vidhan Sabha Election 2024 पुणे : राज्यात होऊ घातलेले विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) निवडणुकींचे बिगूल अखेर वाजले आहे. त्या अनुषंगाने आता राजकीय घडामोडींना वेग आले आहेत. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार असून अनेक इच्छुकांची नावे दररोज समोर येत आहे. अशातच पुण्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. पुण्याच्या हडपसरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला असून हडपसरमध्ये पाच माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडणार आहेत.


अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे हे ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तर हडपसर विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही बोलले जात आहे.  


विद्यमान आमदाराविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार- आनंद अलकुंटे


आनंद अलकुंटे हे माजी नगरसेवक असून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा पुणे महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी पीएमपीएलचे माजी संचालक म्हणून ही काम केलं आहे. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात आनंद अलकुंटे निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. हडपसर मधून अजित पवार समर्थक आणि माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे पती शमशुद्दीन इनामदार यांच्यासह अजून दोन नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडणार आहेत. तर मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत आनंद अलकुंटे हडपसरमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे.


मावळसाठी एकाच पक्षातील दोन नेते इच्छुक


विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. आता लवकरात लवकर पक्षांचं जागावाटप आणि उमेदवार निवडी पार पडतील. सगळ्या पक्षांकडून जागावाटप ठरून उमेदवारांची नावं घोषित केली जाणार असल्याची चर्चा असतानाच आता पक्षांतर्गत धुसफूस समोर येताना दिसत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसे संकेत आता दिसू लागले आहेत. 


मावळमध्ये अजित पवार गटाचे नेते बापू भेगडे यांनी महामंडळाचं पद नाकारलं असून विधानसभा निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत. याबद्दल अजित पवार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या अडचणी वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. 


हे ही वाचा :