Vinayak Raut : नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारसह शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्यावर प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेतील जुने व्हिडिओ दाखवत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी नारायण राणेंवर (narayan rane) प्रहार केला आहे. यासोबतच नारायण राणेंनी सत्तेसाठी लाचारी पत्करली असा आरोप करत विनायक राऊतांनी राणेंवर निशाणा साधलाय. काय म्हणाले राऊत


सिंधुदुर्गातल्या जुन्या राजकीय हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी गृहमंत्र्यांना सांगणार - राऊत


लाव रे तो व्हिडिओ  म्हणत आज विनायक राऊतांनी पत्रकार परिषदेत नारायण राणेंवर आरोप केलेत. राऊत म्हणाले, नारायण राणेंकडून केंद्राय मंत्रीपदाचा दुरपयोग करण्यात आला आहे, यंत्रणांचा केंद्रीय सरकारकडून गैरवापर करण्यात येत असून राणे स्व:ताचा भूतकाळ विसरले का? श्रीधर नाईकांच्या खुनातील आरोपी कोण होते? असा सवाल राऊतांनी केला. राणेंचे आरोप दखल घेण्यासारखे नाही. राणेंनीा भ्रष्टाचाराचे आरोप करणं हेच सिंधुदुर्गातल्या जुन्या राजकीय हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृहमंत्र्यांना सांगणार


सोमय्यांनी राणेंवर केलेल्या आरोपांची शिवसेनेकडून आठवण


मुंबईतल्या अविघ्न पार्कमध्ये राणे पितापुत्रांनी घोटाळा केल्याचा शिवसेनेचा आरोप करण्यात आला. अविघ्न पार्कवरून सोमय्यांनी राणेंवर केलेल्या आरोपांची शिवसेनेकडून आठवण करून देण्यात आली. 


माझं नाव वापरून राणेंचं ट्विट


नारायण राणेंनी विनायक राऊत यांच्या नावाचा उल्लेख करत एक ट्विट केलं होतं, त्यावर राणे केंद्रीय मंत्रीपदाचा दुरपयोग करण्यात आला असून राणेंनी ईडीच्या कागदपत्रांची चोरी केली का? ईडीच्या नावे धमकी देणं शोभतं का? राणेंच्या ट्विटनंतर विनायक राऊतांनी प्रश्न केला आहे. तसंच माझं नाव वापरून राणेंने ट्विट केल्याचा आरोपही विनायक राऊतांनी केलाय. 


 


राणेंनी केलेले ट्विट -






 


राणेंनी आज शिवसेनेवर केलेले आरोप


बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी शिवसेना काढली. सध्याचे प्रमुख मराठी माणसाच्या मुळावर आले आहे, असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मातोश्री पार्ट 2 बेकायदेशीर आहे. पैसे भरुन बांधकामाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. माझ्याकडे त्यांच्या दोन्ही घरांचे प्लॅन असल्याचे राणे म्हणाले. महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांची काय स्थिती आहे. उत्पन्न काय वाढले का? कायदा सुव्यस्था नाही. बेकारी वाढली आहे आणि हे म्हणतात मराठी माणसासाठी शिवसेना. मराठी माणूस मुंबईतून तडीपार झाला आहे. मराठी माणसांसाठी तुम्ही काय केले. उद्योग, रोजगार दिले का? असा सवाल देखील राणेंनी शिवसेनेला केला. हे विकासाचे काहीच बोलत नाहीत. म्हणूनच असे विषय करत असल्याचे राणे यावेळी म्हणाले.


हेही वाचा-



दिशा सालियनची आत्महत्या नाही तर बलात्कार करुन हत्या; त्यावेळी तिथं कोण मंत्री होता? नारायण राणेंचा सवाल