नागपूरः एकीकडे राज्यात खरी शिवसेना आणि शिवसेनेच्या धनुष्या बाणावरील हक्काची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरु असताना नागपुरात शिवसेना महिला आघाडी मध्ये शेकडो महिलांनी प्रवेश घेतला. तसेच पुर्व विदर्भ संपर्क संघटक व प्रवक्ता प्रा.शिल्पा बोडखे यांच्या नेतृत्वात पक्षासोबत प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली. शहरातील रविभवन येथे जिल्हा संघटिका सुरेखा खोब्रागडे व जिल्हा संघटिका सुशीला नायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निहाय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 


येत्या नागपूर महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने सहा विधानसभेतील महिलांना शाखा, उपशाखा, उपविभाग संघटिका व उपशहर संघटिका पदाची जबाबदारी नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. यावेळी शिवसेनेत अनेक महिलांनी प्रा.शिल्पा बोडखे यांच्या हस्ते प्रवेश घेतला. महिला या सर्वच क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत असतात महिलांच्या समस्या आत्मीयतेने सोडवितात व तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन कार्य करीत असतात महिलांना संधी मिळाल्यास प्रत्येक क्षेत्रात यशस्वी पाऊल गाठतात. म्हणुन येत्या महानगरपालिकेत देखील समाजकारणातुन मतदार तयार करावे व शिवसेनेची मजबुत पकड नागपूर शहरात महिला आघाडीच्या पुढाकाराने होईल अशी अपेक्षा बोडखे यांनी व्यक्‍त केली.


NMC Elections : प्रभाग चारचं, नव्याने आरक्षण; पुन्हा आरक्षणाचे दिव्य?


घरोघरी शिवसेनेचा करणार विस्तार


यावेळेस जिल्ह्यातील प्रत्येक प्रभागात महिला शिवसैनिक घरोघरी तयार करण्याचे आश्वासन जिल्हा संघटक सुशीला नायक व सुरेखा खोब्रागडे यांनी दिले. शहराची जबाबदारी घेऊन महिला उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी शहर संघटक माजी नगरसेविक मंगला गवरे व सुरेखा गाडे यांनी दिली. सूत्रसंचालन विजेता कांबळे यांनी केले. बैठकीत मोठ्या संख्येत महिला शिवसैनिकांची उपस्थिती होती.


Vidarbha Flood : सरासरीपेक्षा 190 टक्के अधिक पाऊस, शेतीसोबतच पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान