Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा (ACB) म्हणजे लाचलुचपत विभागाचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. कारण साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायात पार्टनर असलेल्या व्यक्तीला आता एसीबीकडून नोटीस देण्यात आली आहे. दिनकर सावंत यांना 22 जानेवारी या तारखेला रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा नोटीसमध्ये उल्लेख केला आहे. रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर असलेल्या बांधकामाचा नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला असून संबंधित कागदपत्रे हे सोबत आणण्याचे ही या नोटिसमध्ये सांगितले आहे. तर मुलगा शुभम साळवी याने दिलेल्या जबाबानंतर आता व्यावसायिक पार्टनर असलेल्या व्यक्तीची ही चौकशी होणार असल्याचे सांगितले जातंय.
दिनकर सावंत यांना 22 जानेवारी एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी यांच्यावर अवैध मालमत्ता प्रकरणाचा ठपका ठेवत या पूर्वी एसीबीने दिलेल्या तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच या प्रकरणी त्यांची आणि साळवी कुटुंबियांची एसीबीकडून चौकशी देखील झाली होती. अशातच साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायात पार्टनर असलेल्या व्यक्तीला आता एसीबीकडून नोटीस देण्यात आली आहे. त्यानुसार, दिनकर सावंत यांना 22 जानेवारी या तारखेला रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा नोटीसमध्ये उल्लेख केला आहे.
एसीबीकडून आलेल्या नोटीसचा नेमका तपशील काय?
या प्रकरणी एसीबीकडून आलेल्या नोटीसा मध्ये उल्लेख करण्यात आला आहे की, राजन प्रभाकर साळवी, त्यांची पत्नी अनुजा राजन साळवी तसेच मुलगा शुभम राजन साळवी यांच्या विरुध्द दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २४/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ (संशोधन २०१८) चे कलम १३(१) (ब) सह १३ (२) व कलम १२ प्रमाणे अपसंपदेचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत.
14वा वित्त आयोग योजने अंतर्गत रत्नागिरी जिल्हयातील दांडेआडम येथे डंपिंग ग्राउंड करीता कंपाउंड वॉलचे बांधकाम करणे, तसेच रस्ता विकसित करणे हे काम आपण व "साळवी कस्ट्रक्शन" यांनी मिळून केले असल्याचे शुभम राजन साळवी यांनी सांगितलेले आहे. त्या अनुषंगाने आपणाकडे तपास करायचा असलेने आपण दिनांक २२/०१/२०२५ रोजी ११.०० वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्त्नागिरी कार्यालयामध्ये वरील कामासबंधीत सर्व कागदपत्र, आपला ठेकेदार परवाना, करारपत्र, कामाची निविदा कागदपत्र, कामाची वर्क ऑर्डर "साळवी कस्ट्रक्शन" या फर्मला कामाची रक्कम ज्या बँक खात्याव्दारे पाठविली त्या बँक खात्याचे खाते उतारे, तसेच सदर कालावधीतील आपली आयकर विवरणपत्र घेवुन उपस्थित रहावे. असे या नोटीस मध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
हे ही वाचा