रत्नागिरी: राज्यातील सत्तापालटानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी इमान राखून असलेले कोकणातील आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबावर सध्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात चौकशीचे गंडांतर ओढवले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काही दिवसांपूर्वी राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आज राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांना रत्नागिरी येथील एसीबीच्या (ACB) कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या चौकशीनंतर राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी (Anuja Salvi) यांनी रडू कोसळले. अनुजा साळवी यांनी रडतरडतच चौकशीचा सारा वृत्तांत प्रसारमाध्यमांसमोर कथन केला. 


राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आज मला व माझ्या कुटुंबीयांनी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. दुपारी 1 ते 5 असे चार तास आमची चौकशी करण्यात आली. आम्ही एसीबीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि आवश्यक ती कागदपत्रे दिल्याचे राजन साळवी यांनी सांगितले. राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मंगळवारीही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. 


राजन साळवींच्या पत्नीला रडू का कोसळले?


एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनुजा साळवी यांची आज तब्बल चार तास कसून चौकशी केली. या चौकशीनंतर अनुजा यांना आरोपींच्या रजिस्ट्रारमध्ये सही करायला सांगण्यात आले. ही बाब अनुजा साळवी यांच्या मनाला खूपच लागली. त्यामुळे बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनुजा साळवी यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यांनी रडतरडतच प्रसारमाध्यमांना तपशील सांगितला. त्यांनी म्हटले की, आम्हाला एसीबीकडून सांगण्यात आले की, तुम्हाला दुपारी 1 ते 5 या वेळेत चौकशीसाठी यावे लागेल. तुमची चौकशी झाली नाही तर दुपारी चार तास तुम्हाला एसीबीच्या कार्यालयात बसून राहणे बंधनकारक असेल. त्यामुळे आता आम्हाला ४ ते ८ मार्च या काळात रोज एसीबीच्या कार्यालयात यावे लागणार आहे. आज एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून माझी पूर्ण चौकशी झाली. मी त्यांना लागणारी सर्व कागदपत्रंही दिली. चौकशी पूर्ण झाली असली तरी पुढील तीन दिवस आम्हाला एसीबीच्या कार्यालयात यावेच लागणार आहे, असे अनुजा साळवी यांनी सांगितले. 


आणखी वाचा


राजन साळवी यांच्या अडचणी वाढणार? पत्नी आणि भावाला ACB ची नोटीस, अवैध मालमत्ता प्रकरण


मला अटक करा आणि घेऊन जा, माझी कशाचीही तयारी; ACB कारवाईनंतर ठाकरेंचे आमदार राजन साळवी कडाडले