Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नेमका कोणाचा शिवसेनेचा की शिंदे गटाचा यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. शिवसेनेसाठी ज्येष्ठ कायदेतज्ञ आस्पी चिनॉय यांनी बाजू मांडली. प्रतिवादी मुंबई महापालिकेसाठी ज्येष्ठ कायदेतज्ञ मिलिंद साठ्ये यांनी बाजू मांडली. तर मध्यस्थ म्हणून आलेल्या आमदार सदा सरवणकरांसाठी ज्येष्ठ कायदेतज्ञ जनक द्वाकरादास यांनी बाजू मांडली. तिन्ही बाजूंकडून न्यायालयात वकिलांची तगडी फौज तैनात करण्यात आली.


 शिवसेनेच्या वतीने आस्पी चिनॉय यांचा युक्तिवाद  


- राज्य सरकारने साल 2016 मध्ये अद्यादेश काढलेला आहे
- ज्यात राज्य सरकारने आम्हाला दसऱ्याच्या दिवशी मेळावा घेण्याची रितसर परवानगी दिलेली आहे
- अपवाद केवळ गेल्या दोन वर्षांच्या ज्यात कोरोनामुळे तो होऊ शकला नाही
- शिवसेनेचे पदाधिकारी या नात्याने अनिल देसाई यांनी मुंबई महापालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती, मात्र पालिकेने कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव ती नाकारली आहे
-  मी सर्व मुद्यांवर सविस्तर भूमिका मांडणार आहे 
-  दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणं ही त्यांची परंपरा आहे
- जर अचानक कुणी दुसरा तिथे त्याच दिवशी मेळावा घेतो म्हणतोय तर सारी प्रक्रिया थांबवणं अयोग्य आहे. 
- शिवसेना कुणाची? हा मुद्दा वेगळा आहे त्याचा दसरा मेळाव्याशी संबंध नाही.
- गेली अनेक वर्ष पक्ष तिथे कार्यक्रम घेतोय तर तो त्यांचा अधिकारच आहे
- बरं इथे कुणी दुसरा राजकीय पक्ष परवानगी मागत आलेला नाही, केवळ स्थानिक आमदार सरवणकर तिथे परवानगी मागत आहेत


- साल 2016 च्या आदेशात अन्य कुणी परवानगी मागू नये असं म्हटलंय का?, हायकोर्टाचा सवाल
- नाही, तसं काही म्हटलेलं नाही - चिनॉय
- पहिला अर्ज कोणी केला?, हायकोर्ट
- पण फर्स्ट कम फर्स्ट हा नियम इथं लागू होत नाही
- सरवणकर यांनी 30 ऑगस्टला केलाय, तर शिवसेनेने 22 आणि 26 ऑगस्टला अर्ज केला आहे
- अनिल देसाईंचे दोन अर्ज महापालिकेकडे आले आहेत
- जर पोलीस एका आमदाराला आवरु शकत नाहीत तर मग काय उपयोग?
- यापूर्वी शिवाजी पार्कवर ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा असायचा
- पण साल 2016 नंतर ते मुद्दे उरले नाहीत
- साल 2016 चा आदेशच आम्हाला परवानगी देण्याकरता पुरेसा आहे 
- सरवणकर यांच्या याचिकेत त्यांनी आम्हाला विरोध करण्याऐवजी स्वत:साठी मागणी केली आहे
- हे कसं होऊ शकतं?, या अर्जातच विसंगती आहे


ABP Majha LIVE TV | Shiv Sena Dasara Melava| दसरा मेळावा सुनावणी |Shinde Vs Thackeray| Maharashtra