Gulabrao Patil: एकनाथ शिंदे यांच्या बंड्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही शिवसेना दोन गटात विभागले गेली असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळेच प्रत्येक जिल्ह्यात शिंदे गटाचा स्वतंत्र कार्यालय उभारण्यात येत आहेत. जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाच मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. याची जबाबदारी माझ्यावर व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यावर सोपविली असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.


विनायक मेटे यांच्या अपघाताबाबत बोलताना ते म्हणाले की, सकाळी जास्तीच धुक होत, त्यामुळे मदत मिळण्यास उशीर झाला असावा, याबाबत अधिक माहीती नसून त्यावर बोलण उचित होणार नाही. विधान परिषदेचे आमदार असल्यापासून विनायक मेटे यांच्यासोबत संबंध आला. दिलदार मनाचा माणूस होता, असे सांगत गुलाबराव पाटील यांनी सेना-भाजप युती असताना त्यांच्या सोबतच्या आठवणी सांगितल्या. शिवाजी महाराजांच स्मारक व्हावं यासाठी स्मारकाचे डिझाइन तयार करण्यास त्यांचं मोठ योगदान होते. पण मेटे यांचं शिवाजी महाराजांच्या स्मारकाचाचे स्वप्न अपूर्ण राहिलं असल्याची खंत यावेळी मंत्री पाटील यांनी व्यक्त केली. मेटे यांच्या अपघाताची बातमी ऐकल्यावर धक्का बसला, ते आपल्यात नाही यावर अजूनही विश्वास बसत नाही, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.


ओबीसी समाजाबद्दल बोलताना ते म्हणाले की, ओबीसी समाज की इतर कुठला समाज यांच्या आरक्षणासाठी सत्तेत असल्याने लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करू. धरण गावात उद्धव ठाकरे समर्थकांनी महापुरुषांच्या पुतळ्याच शुद्धीकरण केल्याच्या आंदोलनावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली. ज्यांच अस्तित्व राहील नाही, अस्तिस्त्व दाखवण्यासाठी बातम्या याव्यात म्हणून असं आंदोलन केलं जातं आहे. ते एवढे मोठे नाही की मी त्यांच्यावर काय बोलावं, हा त्यांचा बालिशपणा आहे. कालची गर्दी पाहिल्यामुळे ठाकरे समर्थकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते चर्चेत राहण्यासाठी अशा पद्धतीचे आंदोलन करत असल्याचेही प्रत्युत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे समर्थक शिवसैनिकांना दिलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Ministers Portfolio : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, फडणवीसांकडे गृह, उर्जा, जलसंपदा आणि अर्थमंत्रालयाची जबाबदारी
आमच्यात खात्यांबाबत वाद नाही, त्यांना एखादं खातं हवं असेल तर आम्ही देऊ; खातेवाटपावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Cabinet : काँग्रेस राष्ट्रवादीची दुय्यम खाती एकनाथ शिंदे गटाच्या पदरात, खातेवाटपात फक्त फडणवीसांचा बोलबाला! आदित्य ठाकरेंची खातीही भाजपकडे!