Gulabrao Patil: शिवसेना आमचीच, आम्ही बाळासाहेबांचेच शिवसैनिक असं ठासून सांगणारे तसेच शिंदे गटातील नुकतचे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणारे गुलाबराव पाटील यांचा पक्ष भाजप असल्याचा अजब प्रकार आज गुगलवर सर्च केला असता पाहायला मिळत आहे. यावरुन नेमके गुलाबराव पाटील हे भाजपात की शिवसेनेत असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरूनच नेटकरीही अनेक तर्कवितर्क वर्तवत आहेत.


राज्यात नुकतेच मंगळवारी मंत्री मंडळाचा विस्तार झालेला आहे. मध्ये शिंदे सेनेतर्फे शिवसेनेची मुलुख मैदान तोफ समजले जाणारे गुलाबराव पाटील यांनाही कॅबिनेट मंत्री पदाची माळ गळ्यात पडली आहे. त्यांनी नुकतीच कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आज गुगलवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं नाव सर्च केले असता त्यांचा राजकीय पक्ष भाजप असा उल्लेख आढळून येत आहे. विकिपीडियामध्ये गुलाबराव पाटील यांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी असे दाखवत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यातच या प्रकारामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


नेमक काय दिसतयं गुगलवर


गुलाबराव पाटील यांच्या प्रोफाईलमध्ये ते शिवसेना प्रवक्ते असल्याचे सांगण्यात आले आहे. खाली राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी असल्याचे सांगत आहे. त्यामुळे नेमकं गुगलला झालंय काय? असा सवाल उपस्थितीत झाला आहे. विकिपीडिया शक्यतो कुणीही अपडेट करू शकतो. पण एवढ्या मोठ्या सर्च इंजिनवर एका मोठ्या राजकीय व्यक्तीचा पक्ष कसा चुकू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याआधीही गुगलकडून अशा बऱ्याच चुका झालेल्या आहे. कधी भारताचा मॅप चुकीचा दाखवला आहे. तरी कधी कुणाचे नाव चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. त्यामुळे गुगल सगळंच काही खरेच सांगतो, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.




दरम्यान, गुलाबराव पाटील यांची राजकीय कारकीर्द बघितली असता ते 1992 मध्ये एरंडोल पंचायत समितीवर निवडून आले. त्यानंतर त्यांची राजकीय गाडी सुसाट सुटली. 1995 ते 1999 या कालावधीत शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख पदाची धुरा सांभाळली. पुढे 1997 मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यानंतर प्रथमच शिवसेनेच्या माध्यमातून एरंडोल विधानसभा मतदार संघातून 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. दरम्यान 2014 म्हणून ते तिसऱ्यांदा जळगाव ग्रामीण मतदार संघातून विजयी झाले. त्यानंतर युतीच्या मंत्रीमंडळात सहकार राज्यमंत्रीपदावरपदी विराजमान झाले. त्यानंतर ठाकरे सरकारच्या काळात ते राज्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा संधी मिळाली. आणि आता शिंदे सरकारमध्ये त्यांना तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Mumbai Marathon 2023: जानेवारी 2023 मध्ये होणार मुंबई मॅरेथॉन! 30 वर्षांच्या मॅरेथॅाननंतर मुख्यमंत्री झालो: शिंदे
ठाकरे गटाच्या शिफारसीला विधानसभा अध्यक्षांची केराची टोपली, शिंदे गटाच्या उदय सामंत आणि दादा भूसेंची कामकाज समितीवर नियुक्ती