मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठीच्या (Lok Sabha Election) प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर विविध माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतींमध्ये शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीचं वातावरण, महाविकास आघाडीचा प्रचार आणि त्यांना मिळणारं यश, घराणेशाही यासह विविध मुद्यांवर भाष्य केलं. शरद पवारांनी घराणेशाहीच्या मुद्यावर नरेंद्र मोदींना उत्तर दिलं. शरद पवारांनी यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Seat) मतदान केलं. सुप्रिया सुळे सध्या बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शरद पवारांनी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुंबई सोडून बारामतीच्या मतदार यादीत नाव का नोंदवलं या बाबत उत्तर दिलं आहे. 


शरद पवारांनी मुंबईतून नाव काढून बारातमीत का नोंदवलं?


शरद पवारांनी माझं नाव बारामती लोकसभा मतदारसंघात होतं हे खरं आहे,असं म्हटलं. मात्र, ज्यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये लक्ष घातलं होतं त्यावेळी मला सांगण्यात आलं की तुम्ही जर मुंबईचे रहिवासी असाल तर मुबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवता येईल.  त्यामुळं नाव मुंबईत नोंदवलं होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक तुमचं वय 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लढवता येत नाही, त्यामुळं मुंबईतून नाव काढून पुन्हा एकदा बारामती नोंदवल्याचं शरद पवार म्हणाले. 


घराणेशाहीच्या मुद्यावरुन टीका करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना देखील  शरद पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, मला वाटतं मोदींचं मत चुकीचं आहे,तुम्ही तुमच्या पालकांचा मार्ग निवडणं चुकीचं नाही. डॉक्टरांचा मुलगा असो की मुलगी ते त्यांच्या पालकांचा वैद्यकीय पेशा स्वीकारतात. तेच समीकरण राजकीय नेत्यांना लागू होतं, असं शरद पवार म्हणाले.


भाजप बहुमतापर्यंत पोहोचू शकणार नाही : शरद पवार 


शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्यात येणाऱ्या अबकी बार चारशे पारवर देखील भाष्य केलं. चारशेच्या संख्येवर ते कोणत्या निकषानुसार आले. चारशेची संख्या गाठणं अवघड आहे. भाजप बहुमतापर्यंत पोहोचण्याबाबतचं साशंकता असल्याचं शरद पवार म्हणाले. एनडीए विरुद्ध राज्याराज्यांमध्ये रोष असल्याचं देखील ते म्हणाले. इंडिया आघाडी केंद्रातून मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीएच्या सरकारला बाहेर काढण्यात यशस्वी होईल, असं शरद पवार म्हणाले.


संबंधित बातम्या :


North Central Mumbai Lok Sabha Voting: उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच काँग्रेसच्या पंजाला मतदान?, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंसह मतदानाचा हक्क बजावला


गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकर्‍यांसह नेते मंडळी पोहचले मतदानाला; शेतकर्‍यांना पोलिसांनी अडवलं, नेमकं काय घडलं?